

सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि. ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बँकेने यंदा ₹२२४.६९ कोटींच्या एकूण व्यवसायाचा (Mix Business) महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पार केला असून, ही बँकेच्या सातत्यपूर्ण वाढीची साक्ष आहे
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत बँकेने सर्व प्रमुख आर्थिक निकषांमध्ये भरीव सुधारणा केली आहे:
एकूण व्यवसाय: ₹२०१.९२ कोटींवरून वाढून तो ₹२२४.६९ कोटींवर पोहोचला आहे (११.२७% वाढ).
ठेवी: ग्राहकांचा बँकेवरील विश्वास वाढत असून ठेवी ₹१२०.५१ कोटींवरून ₹१३३.३३ कोटी झाल्या आहेत.
कर्जवाटप: बँकेने कर्जवाटपात ₹१० कोटींची वाढ नोंदवत ₹९१.३६ कोटींचा आकडा गाठला आहे.
नफा: बँकेच्या निव्वळ नफ्यात जवळपास तीन पट वाढ झाली असून, तो ₹१३.३५ लाखांवरून ₹३९.५० लाख झाला आहे
बँकेने आपली आर्थिक शिस्त अत्यंत कडक ठेवली आहे. बँकेचा नेट एनपीए (Net NPA) शून्य टक्के असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे. तसेच ग्रॉस एनपीए १.९८% वरून ०.९८% पर्यंत खाली आला आहे. बँकेचा प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (PCR) आता १०३.९८% इतका असून तो मजबूत जोखीम व्यवस्थापन दर्शवतो
शाखांची संख्या: ८
नेट वर्थ: ₹२५.५१ कोटी
राखीव निधी: ₹२०.७१ कोटी
गुंतवणूक: ₹५२.६३ कोटी
बँकेकडून सध्या डिजिटल बँकिंग, ग्राहककेंद्री सेवा आणि CASA वाढीवर विशेष भर दिला जात आहे. योग्य गुंतवणूक धोरण आणि मजबूत रिकव्हरी यंत्रणेमुळे बँक अधिक सक्षम होत आहे
"ही उल्लेखनीय प्रगती आमच्या सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळेच शक्य झाली आहे. भविष्यातही अधिक उत्तम सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे." — बँक व्यवस्थापन, दि प्रताप को-ऑपरेटिव्ह बँक लि.