प्रभात सहकारी पतपेढी मर्या., धाराशिव येथे विविध पदांसाठी भरती

१२ वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी
Prabhat Sahkari Patpedhi Dharashiv
प्रभात सहकारी पतपेढी मर्या. धाराशिव येथे विविध पदांसाठी भरती
Published on

धाराशिव : प्रभात सहकारी पतपेढी मर्यादित, धाराशिव (नोंदणी क्र. ओएसएम/(ओएसएम/आरएसआर/सीआर)/०४२५/०३, दिनांक १९/०६/२००३) या विश्वासार्ह वित्तीय संस्थेमार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संस्थेची मुख्य शाखा प्लॉट नं. १८, नाईकवाडी नगर, धाराशिव येथे असून, तेर (ता. व जि. धाराशिव) येथे रुक्मिणी मंगल कार्यालय शेजारी शाखा कार्यरत आहे. या भरती प्रक्रियेत स्थानिक तसेच अनुभवी उमेदवारांना संधी मिळणार आहे.

रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह – ६ पदे
पात्रता : किमान १२ वी उत्तीर्ण.
अट : संगणक ज्ञान आवश्यक. दुचाकी, वैध ड्रायव्हिंग लायसन्स व दुचाकीचा विमा अनिवार्य.

२) क्लर्क कम कॅशिअर – ६ पदे
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / बी.कॉम / एम.कॉम / जीडीसी अँड ए धारकांना प्राधान्य.
अट : संगणकाचे ज्ञान अनिवार्य.

वसुली अधिकारी – २ पदे
पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर / बी.कॉम / एम.कॉम / जीडीसी अँड ए धारकांना प्राधान्य.
अनुभव : मध्यम किंवा वरिष्ठ व्यवस्थापनाचा अनुभव आवश्यक. सेवानिवृत्त अधिकारी देखील अर्ज करू शकतात.

४) वॉचमन – १ पद
पात्रता : माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल.

५) शिपाई – १ पद
पात्रता : किमान १२ वी उत्तीर्ण.

संस्थेमार्फत पात्र उमेदवारांना आकर्षक वेतन देण्यात येणार आहे. पद क्रमांक १ ते ३ साठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज, बायोडाटा, फोटो तसेच आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रभात सहकारी पतपेढी मर्या., धाराशिव या पत्त्यावर पाठवावेत. तसेच अर्ज prabhat.osbd@rediffmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवता येतील.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभात सहकारी पतपेढीचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे.

Banco News
www.banco.news