

लातूर : प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर (Reg. No. MSCS/CR/456/2011) यांच्या विविध शाखांसाठी त्वरित कर्मचारी भरती जाहीर करण्यात आली आहे. लातूर, धाराशिव, तडवळा आणि उमरगा येथे कार्यरत असणाऱ्या शाखांसाठी वसुली अधिकारी तसेच क्लार्क कम कॅशियर या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
संस्थेचे मुख्य कार्यालय गाळा क्र. ४८ व ४९, दयानंद कॉलेज कॉम्प्लेक्स, बार्शी रोड, लातूर येथे असून ही एक बहुराज्य सहकारी पतसंस्था आहे. संस्थेद्वारे दिलेल्या माहितीनुसार एकूण ६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
१) वसुली अधिकारी (०२ पदे)
या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.कॉम., एम.कॉम., जी.डी.सी. अँड ए. पात्र ठरणार आहेत. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
२) क्लार्क कम कॅशियर (०४ पदे)
या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.कॉम., एम.कॉम., जी.डी.सी. अँड ए. पात्रता आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असल्यास उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
या दोन्ही पदांसाठी संगणकाचे ज्ञान अनिवार्य असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
पात्र उमेदवारांनी आपला अर्ज, बायोडेटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज prabhatmultistate.jobs@rediffmail.com या ई-मेल पत्त्यावर मेलद्वारे किंवा प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., दयानंद कॉलेज कॉम्प्लेक्स, बार्शी रोड, लातूर या पत्त्यावर टपालाने पाठवता येणार आहे.
अधिक माहितीसाठी ०२३८२-२२१३७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
स्वाक्षरित/-
मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रभात मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर