
दी पाचोरा पीपल्स को-ऑप. बँक लि., पाचोरा ही जळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असून ७ शाखांद्वारे बँकेचा कारभार विस्तारलेला आहे. बँकेस खालील पदांसाठी उच्च पात्रता असलेले, अनुभवी, स्व-प्रेरित व्यावसायिक उमेदवार आवश्यक आहेत.
पदाचे नाव व पदसंख्या
क्र. १ : मुख्य कार्यकारी अधिकारी- १
शैक्षणिक पात्रता: रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘सक्षम व पात्र ’ निकष
पात्रता व अनुभव: नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी तसेच ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. बँकिंग / वित्तीय क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ स्तरावर काम केल्याचा किमान ८ वर्षांचा अनुभव असावा. प्रादेशिक भाषा (मराठी)चे ज्ञान असणे फायदेशीर ठरेल. उत्कृष्ट नेतृत्व, संवाद व व्यवस्थापन कौशल्य असावे.
क्र. २ : उपमुख्य कार्यकारी अधिकारी- १
शैक्षणिक पात्रता : JAIIB, CAIIB, MBA (वित्त), संगणक व बँकिंगचे ज्ञान / कोणताही पदव्युत्तर
पात्रता व अनुभव : उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी तसेच ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. समकक्ष पदावर बँकिंगमधील किमान ८ वर्षांचा काम केल्याचा अनुभव असावा.
क्र. ३: शाखा व्यवस्थापक- ३
शैक्षणिक पात्रता: पदवीधर / पदव्युत्तर
पात्रता व अनुभव : उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. किमान २ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.
क्र.४ : कर्ज अधिकारी- १
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर
पात्रता व अनुभव : उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी नसावे व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. किमान २ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.
क्र. ५ : वसुली अधिकारी- १
शैक्षणिक पात्रता: संगणकशास्त्र पदव्युत्तर / एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा IT संबंधित शाखा
पात्रता व अनुभव : उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. संगणक व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार व सुरक्षा धोरणांची जाणीव, उत्कृष्ट संवाद आणि कागदपत्रीकरण कौशल्यासह २ ते ५ वर्षांचा अनुभव असावा.
वरील सर्व पदांसाठी पगार इतर संस्थाप्रमाणे असून, पात्रता, अनुभव व इतर निकषांनुसार तो चर्चेनंतर ठरविण्यात येईल.
वरील निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनी आपला उमेदवारी अर्ज info@ppebank.co.in या ई-मेलवर किंवा वरील पत्त्यावर दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत पाठवावा.
अध्यक्ष / मुख्य कार्यकारी अधिकारी
दी पाचोरा पीपल्स को-ऑप. बँक लि., पाचोरा
नाशिक मुख्य