ओझर मर्चंट्स को-ऑप बँकेत वरिष्ठ स्तरावर महत्त्वाच्या नियुक्त्या

ओझर मर्चंट्स को-ऑप बँकेत IT व कर्ज विभागात नवे उप महाव्यवस्थापक; डिजिटल सेवा व व्यवसाय वृद्धीला चालना
ओझर मर्चंट्स को-ऑप बँक
ओझर मर्चंट्स को-ऑप बँक
Published on

ओझर : स्थानिक बँकिंग क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली असून दि ओझर मर्चंट्स को-ऑप बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर दोन महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बँकेच्या आय.टी. विभागाच्या उप महाव्यवस्थापकपदी साईनाथ बाजीराव पवार यांची, तर कर्ज विभागाच्या उप महाव्यवस्थापकपदी वैभव शांताराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बँकेच्या एकूण प्रगतीत तंत्रज्ञान आणि कर्ज वितरण या दोन विभागांची भूमिका अत्यंत निर्णायक मानली जाते. साईनाथ पवार यांच्या निवडीमुळे बँकेच्या डिजिटल सेवा अधिक सक्षम व गतिमान होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असलेले वैभव जाधव कर्ज विभागाची जबाबदारी सांभाळणार असल्याने बँकेच्या व्यवसाय वृद्धीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या नियुक्त्यांबद्दल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, व्हाईस चेअरमन प्रविण लढ्ढा, ज्येष्ठ संचालक भालचंद्र कासार, विजय शिंदे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शरद वालझाडे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी बँकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी जनसंपर्क संचालिका मंगला कदम, संचालक रवींद्र भट्टड, भारत पल्हाळ, लक्ष्मण सोनवणे, नंदलाल चोपडा, योगेश चांडक, प्रवीण वाघ, रऊफ पटेल, शरद सिन्नरकर, निळकंठ कदम, श्रीकांत कदम, गणेश बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संचालिका जिजाबाई रास्कर, डॉ. मेघा पाटील, ज्योती भट्टड, कार्यलक्षी संचालक अरुण पवार, तज्ज्ञ संचालक ॲड. भूषण जाजू, रोहन कुमार गंगवाल (सी.ए.), बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष संदीप अक्कर, सदस्य भारत आहेर, नवनाथ मंडलिक, तक्रार निवारण समितीचे सदस्य शिरीष कावळे, मुबीन पठाण, विष्णू पगार, प्रशासकीय कार्यालय प्रमुख दत्तात्रय बापट आणि जनरल मॅनेजर (वसुली) मनसुखलाल छाजेड तसेच उप महाव्यवस्थापक विकास मोरे यांनी नव्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या नियुक्त्यांमुळे बँकेच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता येऊन ग्राहक सेवेतही लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Banco News
www.banco.news