

सभेच्या सुरुवातीला बँकेचे उपाध्यक्ष विनोद जवागे यांनी दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभेचे अध्यक्ष निलेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विषयपत्रिकेनुसार कामकाजाला सुरुवात झाली.
सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, ३१ मार्च २०२६ अखेरचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजुरी देणे, अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे, तसेच २०२६-२७ च्या नवीन अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासह सर्व वैधानिक विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याशिवाय २०२४-२५ चा दोष दुरुस्ती अहवाल, २०२५-२६ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद, वैधानिक व अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूक आणि पोटनियम दुरुस्ती या विषयांवर साधक-बाधक चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
६.७५% ऐवजी थेट ८% लाभांश!
संचालक मंडळाने सुरुवातीला ६.७५ टक्के दराने लाभांश देण्याची शिफारस केली होती. मात्र, उपस्थित सभासदांनी लाभांशात वाढ करण्याची ठाम मागणी केली. सभासदांची भावना लक्षात घेऊन अध्यक्ष निलेश देशमुख यांनी थेट ८ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अध्यक्ष निलेश देशमुख, संचालक प्रमोद निरगुडे, सौ. मंदाकिनी पवार, सुनील गिते यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद आढे व व्यवस्थापक अण्णासाहेब बडाख यांनी योग्य खुलासा केला.
व्यासपीठावर उपाध्यक्ष विनोद जवागे, संचालक प्रमोद निरगुडे, सौ. मंदाकिनी पवार, महेश मुळे, सुनील गिते, जयंत शिंदे, अभिजित घोडेराव, अमोल बागुल आदी उपस्थित होते. तर चर्चेत विजयकुमार हळदे, रवींद्र आंधळे, विजय देवरे, विक्रम पिंगळे, सचिन विंचुरकर, दीपक अहिरे, जी. पी. दादा, दादाभाऊ निकम, संदीप दराडे, दिलीप वारे, नंदकिशोर सोनवणे, गफूर मिर्झा आदींनी सहभाग घेतला.
सभेस माजी चेअरमन सर्वश्री मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रमेश राख, भाऊसाहेब खातळे,विजयकुमार हळदे, रवींद्र थेटे,सुधीर पगार, सुनील बच्छाव, शिरीष भालेराव माजी संचालक दिलीप सलादे, महेंद्र बाऱ्हे, अजित आव्हाड,सौ.धनश्री कापडणीस, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, रमेश बोडके,भरत राठोड,प्रदीप अहिरे,अनिल वाघ सभासद सर्वश्री मधुकर आढाव, पंकज सूर्यवंशी, चंद्रकांत गामणे, प्रकाश अहिरे, जगदीश घोडके, किरण निकम,शशिकांत मोरे, कुणाल अहिरे,सतीश भोरकडे,विलास बोडके,विजय सोपे, संजय राव, वाल्मिक मोकळ, किशोर अहिरे, नामदेव वाणी, संजय निकम, हर्षद गुरव, दिपक मोरवाल,अरविंद क्षीरसागर, राहुल बेलेकर, राजेश मिश्रा, ज्ञानेश्वर कासार, योगेश खुर्दळ, गिता हडस आदिसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता सुरू झालेली सभा दुपारी १.३० वाजता सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन आणि राष्ट्रगीताने संपन्न झाली.