

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सरकारी आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आर्थिक आधारस्तंभ असलेल्या 'नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक, नियमित' या बँकेने आर्थिक प्रगतीचा एक नवा टप्पा गाठला आहे. अत्यंत शिस्तबद्ध कारभार आणि सभासदांच्या विश्वासामुळे बँकेने ठेवींमध्ये ४०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक आकडा यशस्वीरित्या पार केला आहे.
‘अ’ वर्ग ऑडिट दर्जाची परंपरा कायम
गत अनेक वर्षांपासून 'अ' वर्ग ऑडिट श्रेणी मिळवण्याची परंपरा या बँकेने कायम राखली आहे. जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी बँकेचे सभासद आहेत. या सभासदांच्या ठेवीदारांनी आणि कर्जदारांनी दाखवलेल्या अतूट विश्वासाचेच हे फलित असल्याचे बँकेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या यशाबद्दल बोलताना बँकेचे अध्यक्ष मा. श्री. निलेश देशमुख म्हणाले की,
"४०० कोटींचा टप्पा हा केवळ आकडा नसून, तो १५ हजार सभासद, ठेवीदार आणि पतसंस्थांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी-कर्मचारी आणि सभासदांच्या एकजुटीने व पारदर्शक कारभारामुळेच आम्ही हे ध्येय गाठू शकलो आहोत. सहकार विभाग आणि डीडीआर कार्यालयाचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे."
बँकेचे उपाध्यक्ष श्री. विनोद जवागे आणि सर्व संचालक मंडळाने या यशाबद्दल सर्व सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आगामी काळात सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक अधिक आधुनिक बँकिंग सेवा आणि नवीन कर्ज योजना राबवण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन उपाध्यक्ष जवागे यांनी दिले. बँकेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सहकार क्षेत्रात बँकेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे.
बँकेच्या ध्येयधोरणांना दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम अध्यक्ष श्री. निलेश यादवराव देशमुख आणि उपाध्यक्ष श्री. विनोद विजय जवागे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांना सहकार्य देण्यासाठी श्री. प्रमोद भगवंतराव निरगुडे, श्री. अजित महेश आव्हाड, सौ. मंदाकिनी विलास पवार, श्री. महेश नारायण मुळे, सौ. धनश्री भालचंद्र कापडणीस, श्री. रविंद्र रघुनाथ बाविस्कर, श्री. सुनिल तबाजी गिते, श्री. मोहन रामचंद्र गांगुर्डे, श्री. ज्ञानेश्वर शंकरराव माळोदे, श्री. जयंत रंगनाथ शिंदे, श्री. विजय पाटीलभाऊ देवरे, श्री. रमेश तुकाराम बोडके, श्री. अभिजीत रमेश घोडेराव, श्री. सचिन कल्याणराव विंचुरकर, श्री. विक्रम विश्वनाथ पिंगळे, श्री. अमोल सुभाष बागुल आणि श्री. भरत वसंत राठोड हे संचालक मंडळ कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा कारभार पारदर्शकतेने सुरू आहे.
प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलींद गजानन आढे आणि व्यवस्थापक श्री. अण्णासाहेब त्रिंबकराव बडाख यांची जोड लाभल्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजात गतिमानता आली आहे. या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच बँकेने सहकार क्षेत्रात आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली आहे. आज ही बँक केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र न राहता, सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनली असून, तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.