म्यूलहंटर!! एआय तंत्रज्ञान रोखणार ठेवींची फसवणूक

आरबीआयचा उपक्रम, बँकांनी खात्यांवर देखरेख वाढवली
MuleHunter.AI
MuleHunter.AI
Published on

देशभरातील बँका ठेवींशी संबंधित फसवणुकीच्या वाढत्या घटनांशी झुंजत आहेत, ठेवींची जोखीम ही कर्ज खात्यांपेक्षा जास्त आहे. मनी लॉन्ड्रिंगसाठी (काळा पैसे पांढरा करणे )वापरल्या जाणाऱ्या म्यूल खात्यांच्या (बनावट, खोटी खाती )वाढीमुळे बँकांकडून केवायसी प्रक्रिया कडक करण्यात आल्या आहेत आणि व्यवहारांवर देखरेख वाढवली आहे. बँका ग्राहकांच्या संख्येत वाढ करण्यासह फसवणूक रोखण्याचे संतुलन साधत असताना, या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आरबीआयचा म्यूलहंटर.एआय उपक्रम आणि वाढीव कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण त्यांना साहाय्यभूत ठरणार आहे.

डिजिटल फसवणूक जसजशी विकसित होत आहे तसतसे बँकांच्या कर्ज खात्यांपासून ठेव खात्यांकडे जोखीम गतिमानतेमध्ये बदल होत आहेत. पूर्वी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठेवींवर आधारित निधी गोळा करणे हे आता मात्र बँकांच्या दैनंदिन कामकाजातील मोठी काळजी ठरू लागले आहे."

कारण म्यूल अकाउंट्स आणि मनी लाँडरिंगमध्ये वाढ झाल्यामुळे बँकांना तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (केवायसी) प्रक्रिया कठोरपणे लागू करण्यास प्रवृत्त केले जात आहे.

"RBI चे MuleHunter.AI" म्हणजे काय, ते कसे काम करते याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

*"आरबीआयचे म्यूलहंटर.एआय" = भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) ‘MuleHunter.AI’ नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधन, जे बँक खात्यांमधील ‘म्यूल अकाउंट्स’ म्हणजेच फसवणूक, मनी लॉन्डरिंग किंवा बनावट व्यवहारांसाठी वापरली जाणारी खोटी / भाड्याने दिलेली खाती ओळखण्यासाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्तेने त्यांचा शोध घेणारे साधन आहे.

*प्रत्यक्ष काम करण्याची पद्धत-

१. डेटा संकलन (व्यवहारांवर देखरेख ):

MuleHunter.AI बँकांमधील लाखो-करोडो व्यवहारांचा डेटा रिअल-टाईम मध्ये पाहते.

२. पॅटर्न ओळखणे (अनियमितता शोधणे):

* अचानक मोठे व्यवहार झाले का?

* एका खात्यातून अनेक छोट्या खात्यांमध्ये पैसे गेले का?

* खातेदाराचे वर्तन त्याच्या नियमित खाते वापरापेक्षा वेगळे आहे का?

असे संशयास्पद बदल AI पटकन ओळखते.

3. फसवणुकीचे नोड्स (जोडबिंदू ) शोधणे (Network Analysis):

अनेक खाती एकमेकांशी जोडून "फसवणुकीचे जाळे" तयार होते.

MuleHunter.AI हे जाळे तोडून – कोणती खाती मुख्य गुन्हेगाराच्या नियंत्रणाखाली आहेत हे तात्काळ सांगते.

४. रिअल-टाईम अलर्ट (तात्काळ सूचना करते ):

संशयास्पद खाते दिसताच बँकेला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना लगेच सूचना केली जाते.

५. कारवाई सुलभ करणे (Actionable Insights):

* बँक ती खाती गोठवू शकते (freeze).

* कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था त्वरित तपास सुरू करू शकतात.

* उदाहरण-

समजा सायबर गुन्हेगारांनी लोकांना ऑनलाइन व्यवहाराद्वारे फसवून पैसे गोळा केले आहेत.

* हे पैसे थेट गुन्हेगाराच्या खात्यात न जाता, १०–१५ सामान्य लोकांच्या खात्यात जातात (ज्यांना "Mule accounts" म्हणतात).

* त्यातून हे पैसे हळूहळू गुन्हेगाराकडे वळवले जातात.

MuleHunter.AI असे संशयास्पद ट्रान्स्फर पॅटर्न (पैशांचे हस्तांतरण )ओळखते आणि बँकांना "हे खाते फसवणुकीसाठी वापरले जात असल्याचा त्वरित इशारा देते.

मिळणारे फायदे :-

* फसवणूक रोखणे

* मनी लॉन्डरिंग थांबवणे

* ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणे

* तपास यंत्रणांना मदत करणे

Banco News
www.banco.news