एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँकेत भरती; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज!

सांगलीच्या एम.डी. पवार बँकेत शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई पदांच्या ११ जागा; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता.
Cooperative Bank Jobs in Sangli Maharashtra 2026 - M D Pawar Peoples Cooperative Bank
ऑफलाईन आणि ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात; वाचा सविस्तर माहिती.
Published on

उरूण इस्लामपूर : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खूशखबर आहे. सांगली जिल्ह्यातील नामांकित 'एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., उरून-इस्लामपूर'च्या प्रधान कार्यालयाकडून विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ११ पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ ही आहे.

बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई या महत्त्वाच्या पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता

1. पदाचे नाव : शाखाधिकारी

एकूण जागा : ०४

आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : एम.कॉम / एमबीए, GDC&A उत्तीर्ण आणि बँकेतील वरिष्ठ पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव.

2. पदाचे नाव : ऑफिसर

एकूण जागा : ०४

आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : बी.कॉम / एम.कॉम / एमबीए आणि किमान ७ वर्षांचा बँकिंग अनुभव.

3. पदाचे नाव : शिपाई

एकूण जागा : ०३

आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव : किमान १२ वी (HSC) उत्तीर्ण किंवा पदवीधर, सोबत दुचाकी चालवण्याचा परवाना (Driving License) आवश्यक.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेल अशा दोन्ही प्रकारे अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाचे दाखले टपालाद्वारे अथवा प्रत्यक्ष बँकेच्या प्रधान कार्यालयात पाठवावेत.

  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: एम. डी. पवार पीपल्स् को-ऑप. बँक लि., प्रधान कार्यालय, महावीर चौक, उरून-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली - ४१५ ४०९.

  • ई-मेलद्वारे अर्ज पाठवण्यासाठी: hr.admin@mdpawar.bank.in

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२६

निवड प्रक्रिया

प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. अर्जाबाबतची अधिक सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरातीसाठी उमेदवारांनी बँकेच्या www.mdpawarbank.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news