
मुंबई – ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ च्या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती मा. मंत्री (सहकार), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार असून एकूण ३२ सदस्य या समितीत सामील आहेत. समितीला दोन महिन्यांच्या आत राज्याच्या सहकार धोरणातील आवश्यक सुधारणा सुचवणारा अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या संदर्भातील शासन निर्णय (क्र. संमकरण 0825/प्र.क्र.191/18-स) जारी केला आहे. मंत्रालय, मुंबई येथून हा आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) याची प्रत उपलब्ध आहे.
या समितीच्या माध्यमातून राज्यात सहकार क्षेत्रात काळानुरूप बदल, नव्या आव्हानांना प्रतिसाद देणारे उपाय आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्याबाबत सविस्तर विचार होणार आहे.
समितीचे अध्यक्ष आणि सदस्य पुढीलप्रमाणेः
अध्यक्ष: मा. मंत्री (सहकार), महाराष्ट्र राज्य
सदस्य: मा. राज्यमंत्री (सहकार), महाराष्ट्र राज्य
मा. सचिव / प्रधान सचिव / अपर मुख्य सचिव (सहकार)
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
आयुक्त, साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे
आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर
आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, मुंबई
आयुक्त, दुग्धव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
संस्था / संघटना प्रतिनिधी:
श्री. सतीश मराठे – संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक, सेंट्रल बोर्ड
श्री. व्ही. व्ही. सुधीर – संचालक, NCCT
श्री. सुवा कांता मोहंती – संचालक, VAMNICOM
श्री. मनोज कुमार – महासंचालक, LINAC
श्रीमती संध्या कपूर – संचालक, NCUI
श्री. आनंद वेंकटेशन – प्राध्यापक, IRMA
श्री. राहुल कांबळे – सहाय्यक प्राध्यापक, IRMA
श्री. विवेक जुगादे – महामंत्री, सहकार भारती
फेडरेशन / संघ प्रतिनिधी:
श्री. विद्याधर अनास्कर – प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
श्री. संजय खताळ – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ
श्री. काकासाहेब कोयटे – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
श्री. सुहास पटवर्धन – अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
श्री. सीताराम राणे – अध्यक्ष, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन
श्री. चेतन नरके – संचालक, कोल्हापूर जिल्हा दूध संघ
बँका प्रतिनिधी:
डॉ. संतोष कोरपे – अध्यक्ष, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
श्री. दिगंबर दुर्गाडे – अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
इतर तज्ज्ञ सदस्य:
श्री. मधुकर चौधरी – सेवानिवृत्त सहकार आयुक्त
श्री. दिनेश ओऊळकर – सेवानिवृत्त अपर आयुक्त
श्री. एस. बी. पाटील – सेवानिवृत्त अपर आयुक्त
श्री. गणेश निमकर – बँकिंग तज्ज्ञ
श्री. सी. डी. काणे – निवृत्त प्राचार्य, डी.के.टी.ई. टेक्सटाईल इंजिनिअरिंग कॉलेज, इचलकरंजी
अपर निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) – सदस्य सचिव
या समितीला “राष्ट्रीय सहकार धोरण २०२५” मधील सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून राज्याच्या सहकार धोरणात आवश्यक सुधारणा सुचवाव्या लागतील.
सहकार क्षेत्रातील धोरणात्मक बदलांची आखणी करण्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण ठरणार असून महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीला नव्या दिशेने नेणारा हा निर्णय ठरू शकतो.