लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती

ग्रॅज्युएट व पोस्टग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती
Published on

लासलगाव (ता. निफाड | जि. नाशिक): लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., लासलगाव येथे करार पद्धतीने विविध महत्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बँकेच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार आहे.

बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर आणि ऑफिसर या पदांसाठी एकूण १४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या सर्व पदांसाठी संबंधित क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता व बँकिंग क्षेत्रातील ठराविक अनुभव असणे अनिवार्य आहे.

पदनिहाय तपशील पुढीलप्रमाणे :

१) डेप्युटी जनरल मॅनेजर
या पदासाठी उमेदवार किमान वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) असणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग क्षेत्रात किमान १५ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. या पदासाठी एकूण २ जागा उपलब्ध आहेत.

२) मॅनेजर
मॅनेजर पदासाठी उमेदवार किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर (ग्रॅज्युएट) असावा. बँकेत किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक असून, या पदासाठी एकूण ५ जागा रिक्त आहेत.

३) ऑफिसर
ऑफिसर पदासाठी उमेदवार किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवाराकडे बँकिंग क्षेत्रातील किमान ८ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी एकूण ७ जागा भरल्या जाणार आहेत.

मुलाखतीची माहिती

वरील नमूद किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आवश्यक सर्व शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे घेऊन बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

बँकेचे मुख्य कार्यालय –
यशश्री बिल्डिंग, स्टेशन रोड, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक – ४२२३०६
(संपर्क क्रमांक : ९८२२०१५०९५)

वेतन व नियुक्ती

वरील सर्व पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता, अनुभव व गुणवत्तेनुसार आकर्षक वेतन दिले जाणार असून, नियुक्ती ही करार पद्धतीने केली जाईल, असे बँक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सदर भरती प्रक्रियेमुळे अनुभवी बँकिंग अधिकाऱ्यांसाठी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

चेअरमन
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., लासलगाव

Banco News
www.banco.news