लातूर अर्बन बँकेला आयएफएससी कोड; आरटीजीएस व एनईएफटी सेवांचा शुभारंभ

स्वतंत्र शाखानिहाय IFSC कोडमुळे देशभर निधी हस्तांतरण अधिक जलद व सुरक्षित; २४ शाखांमधून सुमारे १३४० कोटींचा व्यवसाय
Latur Urban Co-operative Bank Ltd
लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
Published on

Latur Urban Co‑operative Bank ने डिजिटल बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत स्वतःचा स्वतंत्र शाखानिहाय आयएफएससी (IFSC) कोड कार्यान्वित केला आहे. या नव्या सुविधेमुळे बँकेच्या ग्राहकांना आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) द्वारे देशभर जलद व सुरक्षित निधी हस्तांतरणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या सेवांचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी ललितभाई शाह, प्रा. शिवराज मोटेगावकर आणि रमेश राठी यांच्या हस्ते सेवांचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी, अध्यक्ष आकाश राठी, उपाध्यक्ष सी. ए. लक्ष्मीरमण मालू, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, रामबिलास लोया, दिलीप माने, व्यंकटराव गर्जे, प्रदीप बेंद्रे , सी. ए. महेश तापडिया, चंद्रशेखर वडजे, रत्नमाला अंभोरे , शोभा वारद, रमेश भुतडा, चंद्रकांत लड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच व्यवस्थापकीय संचालक नवनीत भंडारी, कार्यकारी संचालक सी. ए. नरेश सूर्यवंशी आणि महाव्यवस्थापक सत्यनारायण खटोड यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांनी सांगितले की, बँकेच्या स्थापनेपासून सुरू झालेली ही सेवा आता अधिक आधुनिक स्वरूपात ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे. सध्या बँकेच्या २४ शाखांमधून सुमारे १३४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला जात असून नव्या IFSC कोड प्रणालीमुळे बँकेच्या डिजिटल व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे.

या सुविधेमुळे ग्राहकांना देशातील कोणत्याही बँकेत सुरक्षित आणि त्वरित निधी हस्तांतरण करणे अधिक सोपे होणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.

Banco News
www.banco.news