

कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या नामांकित सहकारी बँकेत लिपिक (Clerk) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँकेकडून एकूण ३० लिपिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक ही १८ शाखांद्वारे कार्यरत असून बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे १३२० कोटी रुपयांहून अधिक आहे. बँकेचे मुख्यालय डी वॉर्ड, गंगावेश, कोल्हापूर येथे असून बँक सहकारी क्षेत्रात विश्वासार्ह व स्थिर संस्था म्हणून ओळखली जाते.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी https://sznsbal.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ डिसेंबर २०२५ (सकाळी १०.०० वाजता)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ डिसेंबर २०२५ (सायं. ५.०० वाजेपर्यंत)
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
या भरती परीक्षेसाठी उमेदवारांना खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे –
परीक्षा शुल्क: ₹७५०/-
यावर १८% जीएसटी
लागू असलेले बँक व्यवहार शुल्क वेगळे
पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया व इतर अटी-शर्ती याबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी, असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ही जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक लि., कोल्हापूर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.