
वारणानगर येथील दि कोडोली अर्बन को-ऑप. बँकेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी "गोकुळ"चे संचालक अमरसिंह पाटील हे होते.स्वागत उदयसिंह पाटील यांनी केले. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय साळोखे यांनी केले.
येथील सर्वोदय सोसायटी, कोडोलीच्या (ता. पन्हाळा) सभागृहात ही सभा पार पडली. अध्यक्ष राहुल पाटील यांनी प्रगतीचा आढाव घेताना सांगितले की, मार्च २०२४-२०२५ आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी ७७ कोटी असून एकूण कर्जे ४४ कोटी आहेत. अहवाल सालात सभासदांना ९ टक्के इतका लाभांश देणार आहोत.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेस आवश्यक असणारे सीआरएआर प्रमाण १८.३९ टक्के इतके आहे. ते विहीत मर्यादेपेक्षा ९.३९ टक्के इतके जास्त आहे. बँकेचा निव्वळ एनपीए ०.२० टक्के इतका असून नेटवर्थ ७ कोटी पेक्षा अधिक आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असलेचे सुचित होते. बँकेस सन २०१० पासून सतत ऑडिट वर्ग 'अ' राखण्यात यश आले असल्याचे सांगितले.
अहवाल वाचन, कार्यक्रम पत्रिका वाचन व सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय साळोखे यांनी केले. यावेळी नंदन पाटील, बँकेचे उपाध्यक्ष नितीन हुजरे, संचालक डॉ. जयंत पाटील, श्रीपतराव पाटील, रघुनाथ चौगले, बाळासो माने, सचिन जाधव, प्रकाश पाटील, सुभाष जद, रमेश मेनकर, आबासाहेब पाटील, मनोहर पाटील, विवेक जाधव, महिला संचालिका लक्ष्मी चौगले, मनिषा पाटील, ॲड. एम. एन. डवंग यांच्यासह लक्ष्मण कुलकर्णी, राजेंद्र पाटील, जे. ए. पाटील, मानसिंग पाटील, बाजीराव मेणकर व सभासद उपस्थित होते. आभार मनोहर पाटील यांनी मानले.