
पुणे: जिजामाता महिला सहकारी बँक लि. पुणेच्या पदाधिकारी निवडीबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, पुणे (शहर) पुणे यांचे जा. क्र. जिउनिपुणे शहर /पदा. निवड/ जिजामाता बँक/ ब वर्ग / २०२५/२०६८, दिनांक २९/०९/२०२५ रोजीच्या पत्रानुसार श्रीमती निलम पिंगळे, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (२) यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत बँकेच्या अध्यक्षापदी मा. सौ. रेखा मंगलदास बांदल यांची व उपाध्यक्षापदी मा. सौ. मनिषा यशोधन कालेवार यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. यावेळी उपस्थित सर्व संचालिकांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.