

जयसिंगपूर: दक्षिण महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि मल्टि-स्टेट दर्जा प्राप्त असलेल्या ‘डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँक लि., जयसिंगपूर’ यांच्या वतीने विविध शाखांसाठी ‘शाखा व्यवस्थापक / अधिकारी (ऑपरेशनल ऑफिसर / स्टाफ ग्रेड III - ऑफिसर क्लास II)’ पदांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँकेच्या विस्तार आणि व्यवस्थापकीय कामकाजाला गती देण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.कॉम. (B.Com), एम.कॉम. (M.Com) किंवा कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच JAIIB किंवा CAIIB उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना निवडीत विशेष प्राधान्य दिले जाईल.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास बँकेमध्ये 'शाखा व्यवस्थापक' (Branch Manager) म्हणून किमान ३ वर्षांचा आणि बँकेत 'पासिंग ऑफिसर' (Passing Officer) म्हणून काम करण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला सविस्तर बायोडाटा (Resume), शैक्षणिक पात्रता, अनुभवाची प्रमाणपत्रे आणि अपेक्षीत वेतनासह अर्ज सादर करायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत अर्ज बँकेकडे पोहोचणे आवश्यक आहे.
अर्जासाठीचा पत्ता व संपर्क:
अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँक लि. (मल्टी-स्टेट)
१० वी गल्ली, जयसिंगपूर, पिन कोड - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर.
ई-मेल: hrkolhapur86@gmail.com