विक्रम भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली बँकेचा १,७५० कोटींचा टप्पा पूर्ण!

कडक आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि माथाडी कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंत वाढलेला विश्वास - वाचा सविस्तर रिपोर्ट.
ह.भ.प. दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँक
ह.भ.प. दत्तात्रय महाराज जावली बँक ठरतेय सहकारातील नवा आदर्श
Published on

सहकार म्हणजे केवळ आर्थिक देवघेव किंवा बँकिंग व्यवहार नव्हे, तर तो सामाजिक विश्वास, पारदर्शकता आणि लोकसेवेचा ध्यास असतो - हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत ह.भ.प. दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँकेने प्रगतीचा एक नवा इतिहास रचला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध नेतृत्वामुळे गेल्या दशकभरात बँकेने आर्थिक बळकटीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक झेप घेतली आहे.

२०१५ मध्ये विक्रम भिलारे यांनी चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी बँकेचा एकूण व्यवसाय सुमारे १,९५० कोटी रुपये होता. आज कडक आर्थिक शिस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि ग्राहकाभिमुख सेवा यांच्या जोरावर बँकेचा एकूण संमिश्र व्यवसाय तब्बल १,७५० कोटी रुपयांच्या पार पोहोचला आहे. सहकार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या आणि कडक रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या काळात बँकेत झालेली सुमारे ९,८०० कोटी रुपयांची ही अफाट वाढ अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे.

नियोजनबद्ध कामकाज आणि आधुनिक बँकिंगचा ध्यास

बँकेचा विस्तार करताना केवळ आकडेवारी वाढवण्यावर भर न देता प्रत्येक शाखेची गुणवत्ता कशी सुधारेल, याकडे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी विशेष लक्ष पुरवले.

  • आर्थिक शिस्त व पारदर्शकता: कर्जवितरणातील सुटसुटीतपणा आणि पारदर्शकता आणून वसुली यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

  • आधुनिक तंत्रज्ञान: बदलत्या काळानुसार ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या धर्तीवर डिजिटल सेवा पुरवण्यात आल्या.

  • कर्मचारी संघभावना: अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून त्यांना ग्राहकाभिमुख सेवेसाठी प्रेरित केले.

जावली बँकेने नेहमीच सर्वसमावेशक विकासाचे धोरण स्वीकारले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, माथाडी कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक आणि नवउद्योजक यांच्यापर्यंत बँकेच्या विविध कर्ज आणि बचत योजना यशस्वीपणे पोहोचवण्यात आल्या. यामुळे केवळ जावळी तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात बँकेची एक 'विश्वासार्ह आणि प्रगतिशील बँक' म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.

सहकार क्षेत्रात सातत्याने येणारी आव्हाने, आर्थिक चढ-उतार आणि डिजिटल स्पध्रेला समर्थपणे तोंड देत बँकेचा आलेख उंचावत ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, विक्रम भिलारे यांची दूरदृष्टी आणि सभासदांचा वाढता विश्वास या बळावर बँकेने ही किमया साधली आहे. मजबूत आर्थिक पाया, वाढती ग्राहकसंख्या आणि सक्षम व्यवस्थापन यामुळे आज ह.भ.प. दत्तात्रय महाराज जावली सहकारी बँक इतर बँकांसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे.

Banco News
www.banco.news