जनता सहकारी बँक लि.,धाराशिव येथे अधिकारी पदांसाठी भरती

रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार वरिष्ठ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; अर्जासाठी 10 दिवसांची मुदत
जनता सहकारी बँक लि.,
जनता सहकारी बँक लि.,
Published on

जनता सहकारी बँक लि., धाराशिव (बहुराज्य सहकारी बँक) यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

बँकेच्या जाहिरातीनुसार, एकूण दोन पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत.

पदांचा तपशील

  • मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – 1 पद

    • वयोमर्यादा: 35 ते 65 वर्षे

  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) – 1 पद

    • वयोमर्यादा: 35 ते 63 वर्षे

शैक्षणिक पात्रता

उमेदवार पदवीधर असावा. त्यासोबत बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रातील आवश्यक व्यावसायिक पात्रता जसे की CAIIB, बँकिंग/फायनान्समधील डिप्लोमा, ऑपरेशन मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटंट (CA), MBA (Finance) किंवा संबंधित पदव्युत्तर पात्रता असणे आवश्यक आहे.

आवश्यक अनुभव

  • बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर किमान 8 वर्षांचा अनुभव.

  • अनुसूचित वाणिज्यिक बँक, सहकारी बँक किंवा DCC बँकेत कार्याचा अनुभव.

  • रिझर्व्ह बँकेच्या च्या BR Act, 1949 (AACS) तसेच संबंधित नियमांचे ज्ञान.

  • सायबर सुरक्षा विषयातील अनुभव अथवा विशेष लक्ष दिले असल्यास प्राधान्य.

  • CEO पदासाठी उमेदवाराने RBI च्या 'Fit and Proper' निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

कार्यकाल

नियुक्त उमेदवारांचा प्रारंभिक कार्यकाल 5 वर्षांचा राहील. समाधानकारक कामगिरीच्या आधारे व संचालक मंडळ तसेच रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीनंतर कार्यकाल वाढविण्यात येऊ शकतो.

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रत्यक्ष, कुरिअर, ई-मेल किंवा पोस्टाद्वारे पाठवावा.

ई-मेल: headoffice@jsbdharashiv.bank.in

बँकेचा पत्ता:
जनता सहकारी बँक लि., धाराशिव
मुख्य कार्यालय : सोलापूर रोड, धाराशिव – 413501

टीप: ही भरती बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णय व रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीच्या अधीन राहील.
Banco News
www.banco.news