

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र) यांच्या माध्यमातून दि. जालना पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि., जालना येथे ट्रेनी क्लर्क पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.
अतिरिक्त पात्रता: MS-CIT किंवा समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे बंधनकारक.
वयोमर्यादा: ३० सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
अनुभव: बँका किंवा पतसंस्थांमध्ये किमान ६ महिन्यांचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
अतिरिक्त प्राधान्य: JAIIB / CAIIB / GDC&A पात्रता धारकांना प्राधान्य.
बँकेचे कार्यक्षेत्र — जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि परभणी जिल्हे.
लेखी परीक्षेसाठी शुल्क रु. ७४३/- (ना परतावा तत्त्वावर) असून हे शुल्क RTGS / NEFT द्वारे खालील खात्यात जमा करावे:
Bank Details:
Pune District Urban Co-op. Banks Association Ltd., Pune
Bank: Cosmos Co-Operative Bank Ltd., Parvati Darshan Branch
A/c No.: 0010501028653
IFSC Code: COSB0000001
शुल्क जमा पावतीसह उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जात जोडणे बंधनकारक आहे.
इच्छुक उमेदवारांनी असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर www.punebankasso.com उपलब्ध Google Form भरून, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावा.
फी न भरलेले किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने जालना येथे घेतली जाणार आहे. परीक्षेचे ठिकाण, दिनांक आणि स्वरूप याबाबतची सविस्तर माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
महत्त्वाची नोंद: जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद होतील. तसेच परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, असे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.