

संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025” निमित्त भारतातील सहकार चळवळीने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशात सध्या 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था नोंदणीकृत असून त्यापैकी 6.6 लाख संस्था सक्रिय आहेत. या संस्थांद्वारे 32 कोटी सदस्यांना विविध क्षेत्रांत सेवा दिली जात आहे, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाने (PIB) दिली आहे.
शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पतसंस्था, बँकिंग, गृहनिर्माण, महिला सक्षमीकरण अशा 30 हून अधिक क्षेत्रांत सहकारी संस्था कार्यरत आहेत. स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून 10 कोटी महिलांना सहकार चळवळीत जोडण्यात आले आहे.
देशभरातील 79,630 प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या (PACS) संगणकीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.
59,261 PACS ERP प्रणालीवर सक्रिय
65,151 PACS ना हार्डवेअर पुरवठा
42,730 PACS चे ऑनलाइन ऑडिट पूर्ण
32,119 PACS ई-PACS म्हणून सक्षम
देशभरात 32,009 नवीन बहुउद्देशीय PACS, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर सेवा पुरवठा अधिक बळकट झाला आहे.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत
13.77 लाख मेट्रिक टन निर्यात
₹5,556 कोटींची उलाढाल
सदस्य संस्थांना 20% लाभांश
नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेड (NCOL) शी
10,035 सहकारी संस्था संलग्न
28 सेंद्रिय उत्पादने बाजारात
112 PACS मध्ये गोदामे पूर्ण
68,702 मेट्रिक टन साठवण क्षमता निर्माण
सहकारातून ‘सहकार से समृद्धी’ केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पुढाकाराने “सहकार से समृद्धी” या संकल्पनेतून सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक व बहुउद्देशीय बनवण्यावर भर देण्यात येत आहे. 2025 हे वर्ष भारतातील सहकार चळवळीसाठी सुवर्णकाळ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.