

मुंबईतील प्रमुख सहकारी बँकांपैकी एक असलेल्या जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Scheduled Bank) ने विविध वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्रभर 70 हून अधिक शाखांचे जाळे आणि तब्बल ₹ ४६०० कोटींचा बिझनेस मिक्स असलेल्या या बँकेने पात्र, अनुभवी आणि कार्यक्षम उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
बँकेच्या विस्तार आणि व्यवस्थापन बळकटीसाठी खालील पदांवर भरती केली जाणार आहे:
कायदा अधिकारी (Law Officer)
दक्षता अधिकारी (Vigilance Officer)
शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
वसुली अधिकारी (Recovery Officer)
मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – CISO
मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी – CIO
वरिष्ठ बँकिंग व्यावसायिक (Chief Manager / AGM स्तर)
विशेषज्ञ विभागांसाठी भरती
या प्रमुख पदांव्यतिरिक्त खालील क्षेत्रांमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांनाही संधी दिली जाणार आहे:
कर्ज प्रक्रिया (Loan Processing)
क्रेडिट मॉनिटरिंग / वसुली
ऑडिट विभाग
खाते विभाग (Accounts)
मानव संसाधन – HR
ट्रेझरी
मार्केटिंग
जोखीम व्यवस्थापन (Risk Management)
माहिती तंत्रज्ञान (IT)
बँकेने संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अन्य अटींचे तपशील बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले आहेत.
उमेदवारांनी eligibility निकष जाणून घेण्यासाठी www.mahanagarbank.net या वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रे recruit@mahanagarbank.com या ई-मेलवर 21 नोव्हेंबर 2025 पूर्वी पाठवावीत.