सोने विक्री आणि प्राप्तिकर कायदा : गुंतवणूकदारांनी नक्की जाणून घ्या

सोन्यातील गुंतवणुकीवर कोणता कर लागू होतो? जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Tax Rates
सोने विक्री आणि प्राप्तिकर कायदा
Published on

भारतामध्ये सोने हे फक्त दागिना किंवा संपत्ती नसून परंपरेचा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा आधार मानले जाते. लग्नसमारंभ, धार्मिक कार्य, परंपरागत कार्यक्रम अशा अनेक प्रसंगी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मागील वर्षभरात सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 53% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक अधिक आकर्षक बनली आहे.

सोन्याची गुंतवणूक आता केवळ दागिन्यांपुरती मर्यादित नसून गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड आणि Sovereign Gold Bonds असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण, या सर्व व्यवहारांवर प्राप्तिकर कायद्यानुसार कर कसा आकारला जातो, हे समजणे आवश्यक आहे.

खाली सोन्याच्या विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीवरील कराबाबत सविस्तर माहिती:

1) मूर्त स्वरूपातील सोने (Gold Jewellery/Coins/Bars)

▪ खरेदी करताना महत्वाच्या गोष्टी

  • सोन्याचे बील/बीजक घेणे आवश्यक

  • ₹2 लाखांपेक्षा जास्त रोख देयक टाळावे

  • जास्त रोख व्यवहारांची माहिती विक्रेत्याकडून IT विभागाला दिली जाते

  • डिजिटल पेमेंट/चेकने केलेली खरेदी नंतर सोर्स सिद्ध करण्यासाठी उपयुक्त

▪ विक्रीवर कर

  • विक्रीपूर्वी 24 महिने पूर्णदीर्घ मुदतीचा भांडवली नफा (LTCG)

  • 24 महिन्यांपूर्वी विक्री → अल्प मुदतीचा भांडवली नफा (STCG)

कर आकारणी:

  • LTCG वर 12.5% + 4% सेस

  • STCG वर व्यक्तीच्या उत्पन्नकर टप्प्यानुसार कर

  • 1 एप्रिल 2001 पूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला त्या दिवशीचे बाजार मूल्य धरले जाते

  • सोन्यासाठी महागाई निर्देशांकाचा (indexation) लाभ उपलब्ध नाही

Gold Tax Rates
सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे का? – तज्ज्ञांचे विश्लेषण

2) वारसाहक्काने मिळालेले सोने

  • वारसाहक्काने मिळालेल्या सोन्यावर कर लागत नाही

  • परंतु ते विकले तर भांडवली नफा कर लागू होतो

  • अशा सोन्यावर खरेदी वेळीचे मूल्य माहित नसल्यास अडचण येऊ शकते

CBDT च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासात खालील मर्यादेपर्यंत सोने जप्त केले जात नाही:

  • विवाहित स्त्री: 500 ग्रॅम

  • अविवाहित स्त्री: 250 ग्रॅम

  • पुरुष: 100 ग्रॅम

पुरावा उपलब्ध असल्यास कितीही सोने धारण करता येते.

3) गोल्ड ETF (Gold Exchange Traded Fund)

  • यात प्रत्यक्ष सोने खरेदी न करता म्युच्युअल फंड तुमच्या वतीने सोन्यात गुंतवणूक करतो

  • एका युनिटची किंमत 0.01 ग्रॅमपासून असल्याने कमी रकमेपासून गुंतवणूक शक्य

  • शेअर बाजारात खरेदी-विक्रीची सुविधा

  • ETF मधील सोन्याची शुद्धता 995

कर:

  • ETF विक्रीवरील नफा हा मूर्त सोन्याप्रमाणेच करपात्र

  • 24 महिन्यांनंतर – LTCG (12.5% + cess)

  • 24 महिन्यांपूर्वी – STCG (उत्पन्नकपात टप्प्यानुसार)

4) डिजिटल सोने (Digital Gold)

  • ई-वॉलेट/अॅपद्वारे ऑनलाईन खरेदी

  • बाळगण्याचा खर्च/जोखीम नाही

  • किमान गुंतवणुकीची मर्यादा नाही

  • सोन्याचे तिजोरीत सुरक्षित संचयन केले जाते

कर:

  • विक्रीवरील नफा मूर्त सोन्यासारखाच करपात्र

  • परंतु SEBI नियमन नसल्यामुळे जोखीम जास्त

5) सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bonds – SGBs)

  • सरकारद्वारे हमी

  • दरवर्षी 2.5% व्याज, जे करपात्र आहे

  • शेअर बाजारात ट्रेडिंग

  • सोन्याच्या किमती वाढल्या तर थेट फायदा

करातील मोठा फायदा

  • 8 वर्षांनंतर विमोचन → भांडवली नफा पूर्णपणे करमुक्त

  • 8 वर्षांपूर्वी विक्री → LTCG/STCG लागू

Gold Tax Rates
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीबाबत सेबीचा इशारा

सोने विकताना काय काळजी घ्यावी? – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  1. खरेदीचा पुरावा जपून ठेवा, तोच तुमचा ‘सोर्स ऑफ फंड्स’चा आधार

  2. शक्यतो पुन्हा तेच ज्वेलर्सकडे विक्री करा, मूल्यांकन विवाद टळतात

  3. वजन, शुद्धता, deductions यांची तुलना करा

  4. अल्प कालावधीत विक्री टाळा – STCG कर वाढतो

  5. गुंतवणूक उद्देशानुसार SGB, ETF, Physical Gold यातील योग्य साधन निवडा

सोन्यात गुंतवणूक फायदेशीर, परंतु कर नियम समजून करणे आवश्यक

सोन्याचे भाव वाढत असतानाच कर नियम अधिक कठोर झाले आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना कराची जबाबदारी, दस्तऐवजीकरण, आणि गुंतवणुकीचा उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे नियोजन केले तर सोन्याची गुंतवणूक दीर्घकाळात मोठे आर्थिक संरक्षण देऊ शकते.

Banco News
www.banco.news