सहकार खात्याची मोठी घोषणा: GDC&A–CHM परीक्षा मे 2026 मध्ये

23 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज
सहकार आयुक्त व निबंधक
सहकार आयुक्त व निबंधक
Published on

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अँड ए. बोर्ड), पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय सहकार व लेखा पदविका (GDC&A) तसेच सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (CHM) परीक्षांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार सदर परीक्षा दि. २६, २७ व २८ मे २०२६ रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात येणार आहेत.

राज्यातील १७ जिल्ह्यांत परीक्षा

जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. या दोन्ही परीक्षा राज्यातील अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व ठाणे अशा एकूण १७ जिल्ह्यांमध्ये होणार आहेत.

फक्त ऑनलाईन अर्ज; २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

या परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असून, ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्जाची मुदत :
दि. ९ जानेवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६

ऑनलाईन अर्ज संकेतस्थळ :
https://gdca.maharashtra.gov.in

अर्ज भरताना तयार करण्यात येणारा User ID व Password निकाल जाहीर होईपर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी परीक्षार्थ्याची असेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा केंद्र व सेंटर कोड

परीक्षार्थ्यांना दिलेल्या १६ परीक्षा केंद्रांपैकी कोणतेही एक केंद्र निवडणे बंधनकारक असून, एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही.

मुंबई (01), ठाणे (02), नाशिक (06), जळगाव (08), अहिल्यानगर (09), पुणे (10), सोलापूर (11), सातारा (12), सांगली (13), कोल्हापूर (14), छ. संभाजीनगर (15), लातूर (21), अकोला (23), अमरावती (24), नागपूर (27), चंद्रपूर (29), रत्नागिरी (30)

शैक्षणिक व अनुभव पात्रता

या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी परीक्षार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

तसेच, सहकार विभाग, सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीत कार्यरत बिगर-पदवीधर कर्मचारी खालील अटींवर पात्र ठरणार आहेत –

  • HSC उत्तीर्ण झाल्यानंतर किमान ३ वर्षांची सेवा, किंवा

  • SSC उत्तीर्ण झाल्यानंतर किमान ५ वर्षांची सेवा

अशा उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

आवश्यक स्कॅन कागदपत्रे

ऑनलाईन अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, सूट मागत असल्यास गुणपत्रक, परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा तसेच विवाहित महिलांसाठी नाव बदलाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.

परीक्षा शुल्क

  • GDC&A परीक्षा शुल्क : ₹८००

  • CHM परीक्षा शुल्क : ₹५००

शुल्क ऑनलाईन पेमेंट किंवा चलनाद्वारे भरता येईल. फेटाळण्यात आलेल्या अर्जाचे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

विषय सूट (Exemption) नियम

पूर्वीच्या GDC&A किंवा CHM परीक्षेत किमान ५० गुण मिळालेल्या विषयांमध्ये सूट मिळू शकते. मात्र सन २००१ व त्यापूर्वीच्या परीक्षांवर सूट लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा वेळापत्रक

२६ मे २०२६ (मंगळवार)
सकाळी १० ते १ – सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन
दुपारी २ ते ५ – जमाखर्च (Accounts)

२७ मे २०२६ (बुधवार)
सकाळी १० ते १ – लेखापरीक्षण (Auditing)
दुपारी २ ते ५ – सहकाराचा इतिहास, तत्त्वे व व्यवस्थापन

२८ मे २०२६ (गुरुवार)
सकाळी १० ते १ – सहकारी कायदा व इतर कायदे
दुपारी २ ते ५ – सहकारी बँक व इतर वित्तीय संस्था

प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या सूचना

✔ प्रवेशपत्र ऑनलाईन डाउनलोड करावे लागेल
✔ निकालानंतर गुणपत्रक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळणार
✔ वेळापत्रकातील बदल व इतर सूचना फक्त
🌐 https://sahakarayukta.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावरच जाहीर होतील

Attachment
PDF
अधिसूचना 2026 मराठी
Preview
Banco News
www.banco.news