गजानन नागरी सहकारी बँकेला 2.04 कोटींचा निव्वळ नफा; व्यवसाय 262 कोटींवर

ठेवी 157.91 कोटी, कर्जवाटप 104.35 कोटी; NPA शून्यावर, रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण
गजानन नागरी सहकारी बँक
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक डॉ. शेख मंजूर अहमद आणि उपस्थित मान्यवर
Published on

“सर्वांना आपलं मानणारी आपली बँक” या विश्वासाला सार्थ ठरवत श्री गजानन नागरी सहकारी बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली आहे. मार्च 2026 अखेर बँकेला 2 कोटी 31 लाखांचा ढोबळ नफा तर 2 कोटी 4 लाखांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक डॉ. शेख मंजूर अहमद यांनी दिली.

बँकेचा एकूण व्यवसाय 262 कोटी 26 लाखांपर्यंत पोहोचला असून, या यशामागे अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त सोनाजीराव शिरसागर (अण्णा) यांचे नियोजनबद्ध निर्णय आणि अभ्यासू मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपाध्यक्ष जगदीश वासुदेव काळे (भाऊ) आणि संचालक मंडळाचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

गजानन नागरी सहकारी बँक
श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत क्लार्क पदासाठी भरती

31 मार्च 2026 अखेर बँकेची आर्थिक स्थितीही मजबूत राहिली आहे. बँकेचे भाग भांडवल 5 कोटी 81 लाख, राखीव व इतर निधी 19 कोटी 11 लाख असून नेटवर्थ 22 कोटी 55 लाखांवर पोहोचले आहे. बँकेकडे 157 कोटी 91 लाखांच्या ठेवी असून कर्जवाटप 104 कोटी 35 लाखांपर्यंत झाले आहे, तर गुंतवणूक 54 कोटी 38 लाख इतकी आहे. बँकेचा सी.डी. रेशो 66.08 टक्के असून ग्रॉस एनपीए 2.72 टक्के आहे, तर नेट एनपीए शून्यावर आणण्यात बँकेला यश आले आहे. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 23.50 टक्के इतके असून बँक रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण करत आहे.

या आर्थिक प्रगतीबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ. शेख मंजूर अहमद, व्यवस्थापक विलास कुंबेफळकर, वसुली अधिकारी के. ए. लांडे तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news