व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहात

NPA शून्यावर, ऑडिट श्रेणी ‘अ’, डिजिटल बँकिंगकडे वाटचाल
व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँक
बँकेचे अध्यक्ष डॉ.आदित्य सारडा व उपस्थित मान्यवर
Published on

बीड : रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेचा CRAR ९ टक्के असल्यास बँक सक्षम असल्याचे मानले जाते. मात्र, द्वारकादास मंत्री बँकेचा CRAR हा ६६.१५ टक्के आहे. बँकेचे नेटवर्थ हे कमीत कमी २ कोटी पाहिजे, परंतु आपल्या बँकेचे नेटवर्थ हे २४ कोटींच्या वर असल्यामुळे बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून लवकरच बँकेकडून ग्राहकांना डिजिटल बँकिंग सुविधा देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सारडा यांनी दिली. येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची ६३ वी वार्षिक सर्व साधारण नुकतीच बीड शहरातील बालाजी मंदिर सभागृहामध्ये संपन्न झाली. यावेळी डॉ. सारडा बोलत होते.

व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँक
गजानन सहकारी बँक बीडला बेस्ट रिस्क मॅनेजमेंट ॲवॉर्ड प्रदान

सभेला उपाध्यक्ष शुभम चितलांगे, सी. ए. गिरीश गिल्डा, डॉ.आदिती सारडा, अंजली पाटील, डॉ.राहुल खडके,दिनेश देशपांडे, शेख मोहम्मद सलीम, प्रल्हाद वाघ, सुधाकर वैष्णव, राम गायकवाड, सतीश धारकर, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मोमीन शफियोद्दिन, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम सोनी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. सारडा पुढे म्हणाले की, कठीण काळात बँकेच्या कर्मचारी व संचालक मंडळाने बँकेची धुरा नीट चालवल्यामुळे बँक रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधांतून पूर्णतः मुक्त झाली. रिझर्व्ह बँकेचे सर्व आर्थिक नियम बँकेने पाळले आहेत. या सर्व गोष्टीचा परिपाक म्हणून चालू अहवाल वर्षात बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे. वर्षाअखेर बँकेचे वसूल भाग भांडवल २० कोटींच्या वर असून बँकेचा एकूण निधी ९२ कोटींच्या वर आहे. त्यामध्ये बँकेचा राखीव निधी १५ कोटी २८ लाख, बुडीत व संशयित निधी ५३ कोटी ५५ लाख, इमारत निधी २ कोटी ७१ लाख तर १७ लाखांच्यावर गुंतवणूक चढउतार निधी बँकेकडे उपलब्ध आहे. बँकेच्या एकूण ठेवी ६३ कोटींच्या वर असून एकूण कर्जे ७९ कोटी ८२ लाख आहेत.

बँकेची इतर बँकेतील शिल्लक, रोख शिल्लक व शासकीय रोख्यातील व इतर बँकेतील गुंतवणूक ८१ कोटी २४ लाख असून त्यामध्ये शासकीय रोख्यातील गुंतवणूक ६० कोटी ११ लाख आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे शासकीय रोख्यामध्ये NDTL च्या १८ टक्के गुंतवणूक करावी लागते परंतु बँकेनी केलेली गुंतवणूक ही ९४ टक्के पेक्षा जास्त आहे. यातून ही बँकेची आर्थिक स्थिती किती सक्षम आहे हे सिद्ध होते. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.४२ असून बँकेच्या २० शाखा कार्यरत आहेत. उत्कृष्ट वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याचा बक्षीस देऊन गोरव करण्यात आला. सूत्रसंचालन राधेश्याम सोनी यांनी केले तर आभार संचालक संतोष लहाने यांनी मानले.

व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँक
जनता सहकारी बँक धाराशिवमध्ये "मोबाईल बँकिंग"चा शुभारंभ

मंत्री बँकेच्या महत्त्वाच्या योजना: बुलेट सोने तारण कर्ज योजना, सुलभ पगार तारण कर्ज योजना, छोट्या व मध्यम व्यवसायासाठी कर्ज पुरवठा, वाहतूक कर्ज, बांधकाम कर्ज व व्यापारी कर्ज अशा विविध योजनांमार्फत कर्ज वाटप करण्यात येत आहे. याच बरोबर ग्राहकांसाठी लवकरच डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे.

Banco News
www.banco.news