
जयपूर येथील नाबार्डच्या राजस्थान प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून डॉ. आर. रवी बाबू यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. बाबू हे बँकिंग विकासमध्ये २६ वर्षांहून अधिक अनुभव असलेले व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि ग्रामीण पतपुरवठा प्रणालींमध्ये निष्णात अधिकारी म्हणून ओळखले जातात. डॉ. बाबू ग्रामीण आंध्र प्रदेशातील रहिवासी असून, त्यांनी नवी दिल्लीतील आयएआरआय येथून कृषी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे.
डॉ. बाबू यांनी आपल्या कारकिर्दीत, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि मणिपूरसह अनेक राज्यांमध्ये नाबार्डच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी नैसर्गिक शेती, हवामान-सहिष्णू शेती, भूस्थानिक तंत्रज्ञान, पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यांना तळागाळातील वास्तव आणि धोरणात्मक चौकटींची सखोल समज असल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये नाबार्डच्या उपक्रमांना बळकटी मिळेल, अशी अपेक्षा आहे. राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत समावेशक विकास घडवून आणून कर्ज उपलब्धता वाढवणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि सहकारी आणि ग्रामीण वित्तीय संस्थांना पाठिंबा देणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.