डीएनएस बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. गणेश धारगळकर, तर उपाध्यक्षपदी सीए अभिजित मराठे

डोंबिवली नागरी सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध! २०२६–२०३१ या कालावधीसाठी ११ सदस्यीय संचालक मंडळ बिनविरोध; गुजरात आणि कर्नाटकात बँक विस्तारास मंजुरी!
डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.
डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.
Published on

डोंबिवली: सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य आणि मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक असलेल्या 'डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.' (DNS Bank) च्या २०२६–२०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवनिर्वाचित ११ सदस्यीय संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय सहकारिता निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ही प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडली.

बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲड. श्री गणेश धारगळकर तर उपाध्यक्षपदी सीए श्री अभिजित मराठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ॲड. गणेश धारगळकर हे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सहकारी बँकांसाठी गठित केलेल्या 'मॉडेल बॉयलॉज कमिटी'चे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.
डोंबिवली नागरी सहकारी बँकेची यूपीआय सेवा कार्यान्वित!

अनुभवी व तज्ज्ञ संचालकांचा समावेश

बँकेच्या नव्या ११ सदस्यीय संचालक मंडळात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व दिग्गजांचा समावेश आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळ खालीलप्रमाणे:

  • ॲड. श्री गणेश धारगळकर (अध्यक्ष)

  • सीए श्री अभिजित मराठे (उपाध्यक्ष)

  • श्री. योगेश चौधरी

  • श्री. सतीश पटवर्धन

  • डॉ. प्रसाद पत्की

  • डॉ. संदीप घरत

  • श्री. नरेंद्र म्हसकर

  • श्री. गजानन गोडबोले

  • सीए सुधा अय्यर

  • सीए मनोज उत्तुरकर

  • सीए मधुरा ठक्कर

नवनिर्वाचित सर्व संचालकांना बँकिंग, वित्त, विधी, लेखा (Accountancy), व्यवस्थापन आणि व्यवसाय क्षेत्रातील व्यापक अनुभव असून त्यांच्या या अनुभवाचा बँकेच्या भावी वाटचालीला मोठा फायदा होणार आहे.

गुजरात आणि कर्नाटकात बँक विस्तारास मंजुरी

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला नुकतीच भारतीय रिझर्व बँक (RBI) आणि सेंट्रल रजिस्टर ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज यांच्याकडून गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बँक विस्ताराची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यामुळे बँकेच्या भौगोलिक सीमा अधिक विस्तारणार आहेत.

पुढील ५ वर्षांचा रोडमॅप व भर

नवनिर्वाचित संचालक मंडळाने आगामी काळातील बँकेच्या धोरणात्मक उद्दिष्टांची आखणी केली असून, प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे:

  • कार्यक्षेत्रातील उपस्थिती मजबूत करणे: नवीन शाखा व सेवांच्या माध्यमातून नेटवर्क विस्तारणे.

  • डिजिटल बँकिंग सक्षमीकरण: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक जलद व सुरक्षित डिजिटल सेवा पुरवणे.

  • उत्पादने व सेवांचा विस्तार: ग्राहककेंद्रित नवीन आर्थिक योजना व सेवा सादर करणे.

  • MSME व व्यावसायिक क्षेत्राला बळ: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि व्यावसायिकांना सुलभ व सक्षम बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे.

  • सुशासन व शाश्वत विकास: पारदर्शक कारभार (Corporate Governance) आणि मूल्यांवर आधारित शाश्वत विकास साधणे.

डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.
DNS बँकेची दमदार झेप: ७ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार; नेट एनपीए 'शून्य'

संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल सहकार व बँकिंग क्षेत्रातून बँकेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सभासद, ग्राहक आणि सर्व भागधारकांनी (Stakeholders) बँकेवर दाखवलेल्या दृढ विश्वासाबद्दल नवनियुक्त संचालक मंडळाने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आगामी काळात हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि बँकेला नव्या उंचीवर नेण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ कटिबद्ध असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Banco News
www.banco.news