डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या उलवे येथे ७१ व्या शाखेचे भव्य उद्घाटन!

नवी मुंबईतील कार्यविस्ताराला नवी दिशा; स्थानिक नागरिक अन् उद्योजकांसाठी प्रगत सुविधा सज्ज
DNS Bank Latest News 2026 - Ulwe Branch Inauguration
सहकार अन् आधुनिकतेचा मेळ: डोंबिवली नागरी सहकारी बँकेची उलवेत नवी शाखा
Published on

नवी मुंबई : डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या (DNS Bank) उलवे शाखेचे शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात भव्य उद्घाटन करण्यात आले. उलवे येथील ही बँकेची ७१वी शाखा असून, नवी मुंबई परिसरातील बँकेच्या विस्ताराच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यातील उलवे हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. येथील वाढती लोकसंख्या, निवासी व व्यावसायिक विकास आणि भविष्यातील व्यावसायिक संधी लक्षात घेता येथे शाखा सुरू करण्याचा बँकेचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या नवीन शाखेमुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक व विविध संस्थांना आधुनिक आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होणार आहेत.

उलवे शाखेचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवी मुंबई विभाग संघचालक माननीय सीए श्री धर्मेंद्रजी श्रीमल यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील तर विशेष अतिथी म्हणून दिपिशा कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या डॉ. दिपाली गोडघाटे उपस्थित होत्या.

DNS Bank Latest News 2026 - Ulwe Branch Inauguration
डोंबिवली नागरी सहकारी बँकेला प्रतिष्ठित ‘Great Place to Work®’ प्रमाणपत्र प्राप्त
  • सीए श्री धर्मेंद्रजी श्रीमल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता व मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासाठी बँक करत असलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत.

  • श्री. नरेंद्रजी पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी DNS Bank कडून मिळणाऱ्या सहकार्याचे विशेष कौतुक केले.

  • डॉ. दिपाली गोडघाटे यांनी बँकेच्या विविध ग्राहककेंद्री सेवा व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष ॲड. श्री गणेश धारगळकर यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. उलवे परिसरातील नागरिकांच्या आर्थिक गरजा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी बँक नेहमीच कटिबद्ध आहे, असे सांगत त्यांनी उत्तम व विश्वासार्ह बँकिंग सेवांसाठी नागरिकांना डोंबिवली नागरी सहकारी बँकेशी जोडले जाण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कार्यक्षेत्राचा विस्तार करणारी DNS Bank ग्राहककेंद्री सेवा, आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा आणि सहकाराची मूल्ये यांचा सुरेख समन्वय साधत पुढे जात आहे. उलवे शाखा ही या विस्तारप्रवासातील आणखी एक महत्त्वाची उपलब्धी आहे. या शाखेच्या माध्यमातून ठेवी, कर्ज सुविधा, डिजिटल व व्यावसायिक बँकिंगसह विविध आधुनिक सेवा उपलब्ध करून स्थानिक नागरिक व उद्योजकांच्या आर्थिक प्रगतीत सहभागी होण्याचा बँकेचा मानस आहे.

या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यास बँकेचे उपाध्यक्ष सीए श्री अभिजीत मराठे, संचालक श्री गजानन गोडबोले, श्री नरेंद्र म्हसकर, संचालिका सीए सुधा अय्यर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विश्राम दीक्षित, वरिष्ठ अधिकारी, शाखा कर्मचारी, खातेदार, उद्योजक, व्यावसायिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news