धाराशिव जनता सह. बँकेत कर्जवितरण शिबिर उत्साहात

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सविस्तर मार्गदर्शन
धाराशिव जनता सह. बँक
जिल्हा सहकारी बोर्डाचे विकास अधिकारी मधुकरराव जाधव, सहाय्यक निबंधक (प्रशासन) श्री. शेंदारकर, सहाय्यक निबंधक श्री.अंबीलपुरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक, डी. ए. जाधव उपस्थित होते.जिल्हा सहकारी बोर्डाचे विकास अधिकारी मधुकरराव जाधव, सहाय्यक निबंधक (प्रशासन) श्री. शेंदारकर, सहाय्यक निबंधक श्री.अंबीलपुरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक, डी. ए. जाधव उपस्थित होते.
Published on

धाराशिव: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जनता सहकारी बँक लि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जवितरण मार्गदर्शन शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिरास बँकेचे कर्जदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सहकारी बोर्डाचे विकास अधिकारी मधुकरराव जाधव, सहाय्यक निबंधक (प्रशासन) श्री. शेंदारकर, सहाय्यक निबंधक श्री.अंबीलपुरे यांनी प्रस्ताविक केले. यावेळी कार्यालयीन अधिक्षक, डी. ए. जाधव उपस्थित होते.

मधुकरराव जाधव यांनी सभासदांना सहकाराच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक, सामाजिक व परिसरातील प्रगतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सहकार क्षेत्रातील जागरूकता वाढविण्यावर भर दिला आणि सभासदांनी सहकार चळवळीचा प्रभावी भाग व्हावे, असे आवाहन केले.

यानंतर बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनी जागरूक सभासद हेच सहकारी संस्थेच्या प्रगतीचे मुख्य बळ असल्याचे सांगितले. त्यांनी सभासदांना संस्थेबाबत अधिक माहिती घेवून दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. संचालक विश्वासराव शिंदे यांनी सक्षम संचालक मंडळ व जागरूक सभासद हेच संस्थेच्या यशाचे गमक असल्याचे सांगून सभासदांना सहकार चळवळीत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. यावेळी सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले व सहकारामुळेच आपली आणि सर्वसामान्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाल्याचे सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती दिली. डॉ. घोडके म्हणाले की, जनता सहकारी बँक १९३३ पासून ग्राहकांच्या सेवेत असून, बँकेला ९२ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बँकेच्या एकूण ३० शाखा कार्यरत आहेत. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने ३१४५ कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. बँकेचे भाग भांडवल ७९.६८ कोटी ठेवी १८७४.६८ कोटी, कर्जवाटप १२७०.११ कोटी, गुंतवणूक १०९६.६३ कोटी, तर नेट एनपीए शून्य टक्के आणि नफा ४५.०७ कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी कर्जदार सभासदांच्या अडचणी व सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. आण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून अनेक सभासदांना मदत करण्यात आल्याचेही डॉ. घोडके यांनी सांगितले. त्यानंतर सर्व उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व सभासदांचे आभार मानण्यात आले.

बँकेत "योग दिन" देखील उत्साहात साजरा

धाराशिव : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बँकेच्या मुख्य कार्यालयात नुकताच योग दिन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके यांनी आजचे जगणे हे धावपळीचे, धकाधकीचे बनले असून यामुळे स्वास्थ्य नीट ठेवणे अवघड झालेले आहे. त्यासाठी प्रत्येक दिवसाची सुरुवात योगसाधनेने करा, असे आवाहन करून त्यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांकडून प्राणायाम, ध्यान धारणा, योग व शक्तीक्रीया करुन घेतली. नंतर आदर्श जीवन जगताना माणसाची दिनचर्या कशी असावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच धाराशिव शहराबाहेरील कर्मचारी हे ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

Banco News
www.banco.news