कुरुंदवाडच्या दादा जोशी गणेश बँकेला सलग तिसऱ्यांदा 'सर्वोत्कृष्ट बँक' पुरस्कार!

कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचा प्रतिष्ठेचा पुरस्कार सलग ३ऱ्यांदा कुरुंदवाडच्या बँकेला जाहीर.
Best cooperative bank for fixed deposits in Kolhapur - Dada Joshi Ganesh Sahakari Bank Kurundwad
आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनकडून प्रथम क्रमांकाने सन्मानित.
Published on: 

कुरुंदवाड: सहकार व बँकिंग क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभाराचा ठसा उमटवणाऱ्या येथील 'सखाराम उर्फ दादा जोशी गणेश सहकारी बँक लि., कुरुंदवाड' या बँकेने यशाचे नवे शिखर गाठले आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., कोल्हापूर यांच्यावतीने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ साठी देण्यात येणाऱ्या ‘₹१०० कोटींपर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांच्या गटात सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार - प्रथम क्रमांक’ पटकावून बँकेने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावत बँकेने गौरवशाली ‘हॅट्रिक’ साधली आहे.

बँकेची आर्थिक प्रगती, शिस्तबद्ध बँकिंग व्यवहार, ग्राहकाभिमुख सेवा आणि उंचावणारी कार्यक्षमता या निकषांच्या जोरावर बँकेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातत्याने मिळणारा हा सन्मान म्हणजे बँकेच्या सक्षम व्यवस्थापनाची आणि सभासद - ग्राहकांच्या दृढ विश्वासाची पावती मानली जात आहे.

“हा पुरस्कार म्हणजे सर्वांच्या विश्वासाचा सन्मान”

या दैदिप्यमान यशावर प्रतिक्रिया देताना बँकेच्या व्यवस्थापनाने सर्व घटकांचे आभार मानले.

“हा पुरस्कार केवळ बँकेचा नसून बँकेवर अविरत विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक घटकाचा आहे. आमचे सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्या भक्कम पाठबळामुळेच ही हॅट्रिक शक्य झाली आहे. बँकेच्या या यशात सर्वांचा सिंहाचा वाटा असून हा सन्मान आम्ही बँकेशी जोडलेल्या प्रत्येकाला मनापासून समर्पित करतो,” अशी भावना बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

तसेच, “आपला विश्वास हीच आमची खरी ताकद असून, यापुढेही पारदर्शकता, विश्वासार्हता आणि ग्राहकहित जपत अधिक दर्जेदार व आधुनिक बँकिंग सेवा देण्यासाठी बँक सदैव कटिबद्ध राहील,” अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

बँकेच्या नेतृत्वाकडून आभार व्यक्त

बँकेने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल चेअरमन श्री. सदाशिव सखाराम जोशी, व्हाईस चेअरमन श्री. रामचंद्र बाळू मोहिते, मॅनेजर सौ. नीता शरद खलाटे, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या या पुरस्कारामुळे कुरुंदवाड शहर व परिसरातील बँकिंग वर्तुळातून तसेच सभासदांकडून दादा जोशी गणेश सहकारी बँकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Banco News
www.banco.news