कॉसमॉस को-ऑप. बँकेत १५० अधिकारी पदांची भरती

पुणे, मुंबई, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील जागांसाठी अर्जाचे आवाहन
कॉसमॉस को-ऑप.बँक
कॉसमॉस को-ऑप.बँक
Published on

सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कॉसमॉस को-ऑप. बँकेत अधिकारी पदाच्या १५० जागांवर नियुक्ती करावयाची असून, बँकेने प्रगतीच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी महत्त्वाकांक्षी उमेदवारांकडून खालील ठिकाणे व पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

ठिकाणे: पुणे, मुंबई, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा

मॅनेजर – ५० पदे

  • शैक्षणिक अर्हता: CAIIB आणि/किंवा CA/CS/CMA

  • वय: ३१.०८.२०२५ रोजी ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • अनुभव: बँकेतील क्रेडिट पोर्टफोलिओचा किमान ६ ते ७ वर्षांचा अनुभव असावा, त्यापैकी सुमारे ३ वर्षे असिस्टंट मॅनेजर पदावर काम केल्याचा अनुभव आवश्यक. क्रेडिट पोर्टफोलिओतील (मंजुरीपूर्व तपासणी व मूल्यांकन, कागदपत्रे, वितरण, मंजुरीनंतर देखरेख व फॉलो-अप) अनुभव असणे आवश्यक.

प्रोबेशनरी ऑफिसर – १०० पदे

* शैक्षणिक अर्हता:

१. CA-Inter

२. CMA-Inter

३. B.Sc./M.Sc. – गणित

४. B.Sc./M.Sc. – सांख्यिकी

  • वय: ३१.०८.२०२५ रोजी ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • अनुभव: बँकिंग अथवा वित्तीय संस्थेतील अनुभवास प्राधान्य, मात्र अनिवार्य नाही.

निवड प्रक्रिया:

  • पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

  • अनुभवी उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाऊ शकते.

  • वेतन अनुभव व उद्योगमान्य पद्धतींनुसार दिले जाईल.

  • वरील अटी पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी दिनांक ०४.१०.२०२५ पूर्वी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर [www.cosmosbank.com] (http://www.cosmosbank.com) उपलब्ध असलेल्या निर्धारित अर्जपत्रकाद्वारे अर्ज करावा.

उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
Banco News
www.banco.news