कॉसमॉस बँकेच्या अध्यक्षपदी श्री.सचिन आपटे यांची बिनविरोध निवड

तंत्रज्ञ ते बँकिंग धुरंधर: अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ आता सांभाळणार कॉसमॉस बँकेची धुरा.
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
Published on

देशातील अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी बँकेचे वरिष्ठ संचालक श्री.सचिन आपटे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.

सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी श्री.सचिन आपटे यांच्या अध्यक्षपदासाठी एकमताने मान्यता दिल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे श्री.जितेंद्र डूडी यांनी सहकार निवडणूक प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे मान्यतेनंतर जाहीर केले.  

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
कॉसमॉस बँकेची गुजरातमध्ये मोठी झेप; १० नवीन शाखांचे एकाच वेळी उद्‌घाटन

अनुभवी आणि अष्टपैलू नेतृत्व

नवनियुक्त अध्यक्ष श्री. सचिन आपटे हे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (COEP) पदवीधर असून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ते बांधकाम क्षेत्रात प्रवर्तक आणि विकासक म्हणून कार्यरत आहेत. केवळ भारतच नव्हे, तर परदेशातील व्यावसायिक क्षेत्राचाही त्यांना दांडगा अनुभव आहे.

व्यवसायाव्यतिरिक्त श्री.सचिन आपटे हे :

  • विविध नामांकित रुग्णालये आणि ट्रस्टसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

  • हॉस्पिटॅलिटी आणि रेस्टॉरंट उद्योगातील एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे.

  • अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशी ते गेल्या अनेक वर्षांपासून निगडित आहेत.

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक
कॉसमॉस बँकेचा 120 वर्षांचा प्रवास, दृष्टिहीनांना मिळाली नवी दिशा

बँकेतील कार्यकाळ

श्री.सचिन आपटे हे २०१९ पासून कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. यापूर्वी २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात त्यांनी बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. बँकेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्या निवडीमुळे बँकेच्या प्रगतीला अधिक वेग मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Banco News
www.banco.news