कॉसमॉस बँकेत सहकार सप्ताहाची उत्साहात सुरुवात

ध्वजारोहण करून सहकाराच्या मूल्यांची पुनर्स्मृती
कॉसमॉस बँक
अध्यक्ष ॲड.प्रल्हाद कोकरे ,उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार,सौ.रेखा पोकळे,डॉ. बाळासाहेब साठे,सौ.रसिका गुप्ता,सौ. अपेक्षिता ठिपसे,सौ.आरती ढोले व उपस्थित मान्यवर
Published on

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत सहकार सप्ताहाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. बँकेचे अध्यक्ष ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी ध्वज फडकावून सहकार सप्ताहाचे उद्घाटन केले.

ॲड. कोकरे हे पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे संचालक असून सहकार क्षेत्रातील त्यांच्या सक्रिय भूमिकेची दखल या समारंभात घेण्यात आली.

समारंभात बोलताना ॲड. प्रल्हाद कोकरे यांनी सहकार तत्त्वज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. “सहकार हे सर्वांगीण विकासाचे बळ आहे. समाजाच्या प्रगतीसाठी सहकाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कॉसमॉस बँक नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत सहकाराचा आदर्श ठेवत आली आहे,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष सीए. यशवंत कासार, संचालक सौ. रेखा पोकळे, डॉ. बाळासाहेब साठे, सौ. रसिका गुप्ता, व्यवस्थापकीय संचालिका सौ. अपेक्षिता ठिपसे, सह व्यवस्थापकीय संचालिका सौ. आरती ढोले यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम, कर्मचारी सहभाग आणि ग्राहकाभिमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून सहकार मूल्यांचा प्रसार करण्याचे नियोजन बँकेने केले आहे.

Banco News
www.banco.news