त्यागराज सहकारी बँक अध्यक्षांकडून राष्ट्रीय सहकार धोरणाचे स्वागत

धोरणाला सहकारातील ‘परिवर्तनकारी टप्पा’ संबोधले
त्यागराज सहकारी बँक
त्यागराज सहकारी बँकत्यागराज सहकारी बँक
Published on

श्री त्यागराज सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. एम.आर.वेंकटेश यांनी नुकतेच जाहीर झालेल्या राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ चे स्वागत करताना त्याला "भारताच्या सहकारी क्षेत्रासाठी एक परिवर्तनकारी टप्पा" असे संबोधले आहे. त्यांनी या धोरणामागील दृष्ट्या नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

डॉ. वेंकटेश यांनी व्यक्त केलेले मुद्दे :

* हे धोरण सहकारी चळवळीला नवीन दिशा आणि वेग देणारे ठरेल.

* या धोरणात भारताच्या आर्थिक विकासाचे दुसरे इंजिन बनण्याची क्षमता आहे.

* सहकारी संस्था आता तरुणांना आकर्षित करतील आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती साध्य होईल.

धोरणातील प्रमुख मुद्दे:

* कृषी, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन क्षेत्रात २ लाख नवीन प्राथमिक सहकारी संस्थांची निर्मिती

* सहकारी भरती मंडळे, लेखापरीक्षण आणि नियामक संस्था, न्यायाधिकरणांची स्थापना

* ई-कॉमर्स व जागतिक व्यापारात सहकारी संस्थांना प्रोत्साहन

डॉ. वेंकटेश यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रीय सहकार धोरण ठरविण्यासाठी सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या नेतृत्वाखाली सतत दोन वर्षे चाललेली देशव्यापी सल्लामसलत, विचारविमर्श केला. त्यामुळे हे धोरण केवळ धोरणात्मक दस्तऐवज न राहता, ग्रामीण भारताला सबळ करणारा आणि सहकार क्षेत्राला आधुनिक काळाशी जोडणारा वास्तववादी आराखडा आहे." त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाचे अभिनंदन करत, संपूर्ण सहकार क्षेत्राने याचा सक्रियपणे फायदा घ्यावा, असे आवाहनही केलेले आहे.

* बँको न्यूज: सहकारी आणि ग्रामीण बँकिंग क्षेत्रातील विश्वासार्ह डिजिटल माध्यम

Banco News
www.banco.news