चिपळूण अर्बन बँकेच्या वतीने १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक; १३० हून अधिक विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
Chiplun-Urban-Bank-Merit-Students-Felicitation-News-2026
चिपळूण अर्बन बँकेकडून १० वी, १२ वीच्या १९ हायस्कूल व ३ महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Published on

चिपळूण: शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या कुटुंबाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा चिपळूण अर्बन बँकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. चिपळूण परिसरातील तब्बल १९ हायस्कूल आणि ३ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा या गुणगौरव सोहळ्यात समावेश होता. बँकेच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप: पालकवर्ग भावूक

या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील १३० हून अधिक विद्यार्थी आपल्या पालकांसह या सोहळ्याला उपस्थित होते. बँकेने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल बोलताना पालक अ‍ॅड. मिलिंद तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "चिपळूण अर्बन बँकेने विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा जो गुणगौरव केला आहे, त्याचा आम्हा सर्व पालकांना अतीव आनंद होत आहे," अशा शब्दांत त्यांनी बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

या नामांकित शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश

या सोहळ्यात चिपळूण परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:

  • युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण, ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल, बांदल हायस्कूल.

  • आरसी काळे ज्युनिअर कॉलेज, दलवाई हायस्कूल, परांजपे मोतीवाले हायस्कूल.

  • अली पब्लीक स्कूल, मेरी माता इंग्लिश स्कूल, इकरा इंग्लिश मिडीअम स्कूल.

  • मा. बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कालुस्ते हायस्कूल.

  • खतिजा इंग्लिश स्कूल, न्यु इंग्लिश स्कूल सती, एसपीएम, महाराष्ट्र हायस्कूल.

  • एसीबी इंटरनॅशनल स्कूल, नॅशनल इंग्लिश मेडीअम स्कूल आणि डीबीजे महाविद्यालय या संस्थांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Chiplun-Urban-Bank-Merit-Students-Felicitation-News-2026
१० वी, १२ वीच्या १९ हायस्कूल व ३ महाविद्यालयांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

बँकेचे संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्याला चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री. मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष श्री. धनंजय खातू, संचालक श्री. मिलिंद कापडी आणि अ‍ॅड. श्री. दिलीप दळी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोगत व्यक्त केले.

याशिवाय बँकेचे माजी अध्यक्ष श्री. निहार गुढेकर, संचालक श्री. रहीमान दलवाई, श्री. समीर जानवलकर, सीए श्री. विवेक रेळेकर, श्री. रत्नदीप देवळेकर, श्री. अविनाश केळसकर, श्री. मधुसुदन माने हेदेखील उपस्थित होते. बँकेच्या व्यवस्थापकीय चमूचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. तुषार सुर्यवंशी, चिफ ऑफिसर श्री. नितीन चिंगळे, शाखाधिकारी श्री. दिनेश रेडीज, अधिकारी श्री. श्रीराम देवळेकर, श्री. ओंकार पाथरे आणि प्रशासन अधिकारी श्री. समीर जंगम यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर यांच्यासह शिक्षक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विद्यार्थी व पालकांकडून आभार

आपल्या यशाची बँकेने दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गाने चिपळूण अर्बन बँकेचे मनापासून आभार मानले. हा सत्कार पुढील वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन बँकेचे प्रशासन अधिकारी श्री. समीर जंगम यांनी केले.

Banco News
www.banco.news