"बँको " तर्फे नुकतेच दमण येथे सहकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक व प्रमुख वक्त्या श्रीमती शुभलक्ष्मी शिराली, व्यवस्थापकीय संचालक, ठाणे जनता सहकारी बँक यांनी, "सध्या जग तंत्रज्ञानावर चालत आहे. बाजारात सातत्याने नवनवे तंत्रज्ञान येत आहे. पतसंस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून आपला विकास करावा", असे आवाहन केले.
श्रीमती शिराली म्हणाल्या की, "तीन-चार वर्षांपूर्वी कोरोना या महामारीने संपूर्ण जग ठप्प केले होते. यामुळे प्रत्येक क्षेत्राला महामारीचा फटका बसला. या अत्यंत खडतर काळाने सर्वांनाच नवनवे तंत्रज्ञान वापरण्यास भाग पाडले. यामुळे आपले आयुष्यच बदलून गेले. वर्षापूर्वी आपण एटीएमचा वापर करून पैसे काढत होतो. तेच पैसे आपण देवघवीसाठी वापरत होतो. आता सर्व काही मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. जीपीए व एक क्यूआर कोड इतकेच आता पुरेसे आहे. क्रेडिट सोसायट्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी आता चार पिलरवर काम करणे आवश्यक आहे.
1) व्यवसाय वाढ,
2) लाभ वाढ,
3) तंत्रज्ञानाचा वापर व
4) रेग्युलेटरी कंप्लायन्स होय.
स्पर्धात्मक काळात यावर काम केल्याशिवाय पतसंस्थांकडे दुसरा पर्याय नाही. बँकांना जे आरबीआयचे नियम लागू आहेत ते पतसंस्थानांही लागू होणार आहेत. यामुळे या चार पिलरवर काम करणे आवश्यक ठरते. यातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तंत्रज्ञान परिवर्तन. पूर्वी आपल्याकडे लेजर होते. त्यानंतर शाखा संगणीकृत झाल्या. त्यानंतर सर्व शाखाचे ऑटोमेशन झाले. त्यानंतर सीबीएस म्हणजे कोर बँकिंग सिस्टिम आली.आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. (अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा)