बळवंत पतसंस्थेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार

“बेस्ट इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफॉर्मेशन” पुरस्काराने सन्मान
बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,
Published on

सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बळवंत पतसंस्थेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक समिट (NCBS) ने आयोजित 19 वी राष्ट्रीय सहकार परिषदेत संस्थेला “बेस्ट इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025” प्रदान करण्यात आला. हा भव्य सोहळा दिनांक 17 व 18 सप्टेंबर 2025 रोजी हॉटेल हॉलिडे इन, गोवा येथे पार पडला.

बळवंत पतसंस्थेने आपल्या गुंतवणूक व्यवस्थापनातील पारदर्शकता, शून्य अनुत्पादकता आणि सातत्यपूर्ण नफा यामुळे राष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळवली आहे.

मार्च 2025 अखेरच्या आर्थिक अहवालानुसार, संस्थेच्या ठेवी ₹3079.81 लाख, कर्ज ₹2241.42 लाख, गुंतवणूक ₹2174.95 लाख, आणि निव्वळ नफा ₹65.79 लाख इतका आहे. याच आर्थिक वर्षात संस्थेला गुंतवणुकीवर मिळालेले एकूण व्याज ₹161.86 लाख असून, सर्व गुंतवणूक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (JDCC) व शेड्युल नागरी सहकारी बँकांमध्ये आहे. संस्थेचे अनुत्पादक गुंतवणूक प्रमाण 0% आणि निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण 0% आहे.

खान्देशातील एकमेव ISO 9001:2015 प्रमाणित पतसंस्था म्हणून बळवंत पतसंस्थेने डिजिटल युगात अत्याधुनिक वेब-बेस्ड कोअर बँकिंग सोल्यूशन सॉफ्टवेअरचा अवलंब केला आहे. सध्या संस्थेच्या जळगाव शहरात तीन शाखा असून, स्वमालकीचे सुसज्ज मुख्य कार्यालय कार्यरत आहे.

या वर्षी संस्थेचे रौप्य महोत्सवी (25वे) वर्ष साजरे होत असून, “हातात हात – गरजूला साथ” या ब्रीदवाक्याप्रमाणे संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचणाऱ्या बळवंत पतसंस्थेच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे जळगाव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Banco News
www.banco.news