औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘कार्यकारी संचालक’ पदासाठी भरती जाहीर

पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
Published on

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (छत्रपती संभाजीनगर) येथे ‘कार्यकारी संचालक (मुख्य कार्यकारी अधिकारी)’ या महत्त्वाच्या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत जाहिरातीनुसार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून मुदतीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरतीअंतर्गत कार्यकारी संचालक पदाची एक जागा भरली जाणार आहे. उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक असून त्यासोबत एच.डी.सी./सी.ए.आय.आय.बी./डी.सी.बी.एम. किंवा समकक्ष पात्रता असणे अपेक्षित आहे. चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट तसेच पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.

अनुभवाच्या निकषानुसार उमेदवाराला मध्यम किंवा उच्च व्यवस्थापन स्तरावरील बँकिंग क्षेत्रातील किमान आठ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभवाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वेतन हे शैक्षणिक पात्रता व अनुभव लक्षात घेऊन निश्चित करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण तपशीलासह (बायोडाटा) अर्ज दिनांक ११ मार्च २०२६ पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात पाठवावा. अर्जावर ‘कार्यकारी संचालक’ या पदासाठी अर्ज असल्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख व अनुभव प्रमाणपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती तसेच अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे बंधनकारक आहे.

निवड प्रक्रियेसंदर्भातील अंतिम निर्णय निवड समितीचा राहणार असून आवश्यकतेनुसार अटींमध्ये शिथिलता देण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news