ATM
ATM

एटीएममध्ये पैसे अडकले? जाणून घ्या काय करावे

....तर घाबरू नका, जाणून घ्या.....
Published on

एटीएम मध्ये अडकलेली रक्कम या स्टेप्सद्वारे लागलीच परत मिळवता येईल.

ATM Cash Withdrawal (एटीएम मधून पैसे काढणे): काही वेळा एटीएममधून रक्कम काढताना काही तांत्रिक कारणामुळे ती मशीनमध्येच अडकते. तेव्हा सर्वात अगोदर पुढीलप्रमाणे काळजी घ्या.

अनेकदा एटीएममध्ये रक्कम काढताना ती अडकते. अथवा अर्धी रक्कम बाहेर येते आणि काही नोटा या मशीनमध्येच अडकतात. अशावेळी घाबरू नका. सर्व्हरमधील बिघाडामुळे ही समस्या येते. फसलेली नोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती फाटण्याची शक्यता असते.

काही वेळ वाट पाहूनही एटीएम मशीनमधून जर रक्कम बाहेर आली नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वळती झाली असेल (मोबाईलवर तसा मेसेज आला) तर व्यवहाराची पावती संभाळून ठेवा. पावती मिळाली नसेल तर आलेला मेसेज अथवा बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला तक्रार करताना उपयोगी पडेल.

ATM
आरबीआयचे "एटीएम" वापरासाठी नवे नियम

अनेकदा बँकांच्या कार्यप्रणालीमुळे आपोआप ही तुम्हाला न मिळालेली रक्कम बँक तुमच्या खात्यात २४ तासात पुन्हा जमा करते. त्यामुळे लागलीच अस्वस्थ होऊ नका. थोडा धीर धरा.

२४ तासानंतरही जर रक्कम खात्यात वळती झाली नाही तर ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. त्यांना एटीएम मशीन कोणत्या भागातील आहे, कोणत्या बँकेचे आहे याची व्यवस्थित माहिती द्या. साधारणपणे बँका अशी न आदा झालेली रक्कम सात दिवसात परत करतात.

कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर मग तुमच्या जवळच्या शाखेत तक्रार नोंदवा. त्यांच्याकडून ट्रॅकिंग क्रमांक घ्या. त्याआधारे तुमच्या तक्रारीवरील कारवाईची स्थिती लक्षात येते.

ATM
Co-operative Banks should adapt fintech and be future ready

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमानुसार, बँकांना ४५ दिवसाच्या आत त्यांच्या व्यवहाराचा तपशील पडताळून ग्राहकांना त्यांची रक्कम परत करावीच लागते. अन्यथा ग्राहकाला त्याची मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज सुद्धा बँकेने द्यावे लागते.

Banco News
www.banco.news