आष्टा पीपल्स बँकेची ६७ वी वार्षिक सभा उत्साहात; १४% लाभांश जाहीर!

६७ व्या वार्षिक सभेत विविध विषयांना मंजुरी; आधुनिक डिजिटल सेवांचा विस्तार करण्याचे चेअरमन बबन थोटे यांचे आवाहन.
Ashta Peoples Bank Net Banking / Mobile Banking
६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; १००% वसुली करणाऱ्या शाखांचा विशेष सत्कार.
Published on

आष्टा: दि आष्टा पीपल्स को-ऑप. बँक लि., आष्टा यांची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी हेव्हन हॉल, तासगांव रोड, आष्टा येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये सभासदांना १४% लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

सभेची सुरुवात बँकेच्या ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. बँकेचे अध्यक्ष श्री. बबन जिनदत्त थोटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मारूती भिमाण्णा मासाळ यांनी नोटीस, मागील सभेचे इतिवृत्त, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले, ज्याला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

Ashta Peoples Bank Net Banking / Mobile Banking
आष्टा पीपल्स को-ऑप.बँकेस पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी

बँकेची आर्थिक प्रगती आणि भविष्यातील नियोजन: अध्यक्षीय भाषणात श्री. बबन थोटे यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला:

  • ठेवी: रु. ४४३ कोटी

  • कर्ज वाटप: रु. २७४ कोटी

  • भाग भांडवल: रु. १७ कोटी

  • स्वनिधी: रु. ५७ कोटी

  • खेळते भांडवल: रु. ५३२ कोटी

  • नफा: मार्च २०२६ अखेर रु. ९ कोटी ०४ लाख ढोबळ नफा झाला असून, तरतुदी वजा जाता रु. ३ कोटी ६७ लाख निव्वळ नफा झाला आहे.

बँकेचे कामकाज सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील २३ शाखांद्वारे सुरू असून, ग्राहकांसाठी UPI, RTGS, NEFT, CTS चेक सुविधा, एसएमएस बँकिंग, एटीएम व रुपे डेबिट कार्ड यांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सभेत बँकेचे आदर्श अधिकारी श्री. देवचंद्र कल्लाप्पा आवटी (सब अकौंटंट, कायदा विभाग), श्री. सुरेश शामराव थोरबोले, आदर्श आयटी क्लार्क ज्योती उत्तमराव शिंदे, आदर्श क्लार्क कु. अश्विनी आप्पासो हाके व आदर्श शिपाई श्री. विक्रम बबन खोत यांचा सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.

तसेच आदर्श शाखांमध्ये प्रथम क्र. आरग, द्वितीय क्र. पलूस व तृतीय क्र. तासगांव शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अहवाल सालात १००% वसुली करणाऱ्या किणी, शाहूपुरी (कोल्हापूर), हुपरी, राजारामपुरी (कोल्हापूर), १०० फुटी रोड (सांगली), इस्लामपूर, पलूस व ताराबाई पार्क (कोल्हापूर) या शाखांचा विशेष गौरव करण्यात आला.

बँकेचे चेअरमन श्री. बबन जिनदत्त थोटे, व्हाईस चेअरमन श्री. विराज शंकरराव शिंदे व सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मारूती भिमाण्णा मासाळ यांचाही ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सभेस आष्टा नगरीचे उपनगराध्यक्ष व बँकेचे संचालक श्री. दिलीप वग्याणी, संचालक जयदीप थोटे, कौशिक वग्याणी, फंचु हालूंडे, अनिल चौगुले, सुरेश पाटील, राहुल पाटील, सुनील वाडकर, संदीप आवटी, अनिल पाटील, अनिल निर्मळे, रामचंद्र सिद्ध, विष्णू वारे, शुभदा चौगुले, सविता आवटी, विनोद पाटील (CA), संपत देमाण्णा, तसेच माजी संचालक रघुनाथ जाधव, राजाराम हाके, अजित शिरगांवकर, अनिल मडके, उषाराणी आवटी व व्यवस्थापन समिती सदस्य सौ प्रिती पाचोरे सीए, नितीन झंवर, सुरेश कबाडे, बाळासोा वाडकर, सचिन चौगुले, बँकेचे सर्व माजी संचालक तसेच खासकरून शरद शेडगे, रमेश हाके, महावीर थोटे, अशोक वडगांवे, प्रकाश मगदूम, आण्णासो, कोले महावीर चौगुले, सुरेश रोटे, भाऊसो हालुंडे, महावीर मालगांवे, डी. के. पाटील, महावीर पाटील, व्ही. डी. पाटील, सुर्यकांत पाटील, शांतिनाथ पाटील, तात्यासोो मगदूम, बाबासोो सिध्द, दत्तात्रय मस्के, सुभाष हिंगमिरे, सुरेश आवटी, कुलभूषन आवटी, मोहनराव गायकवाड, शिवाजी ढोले, राहुल माणगांवे, डी. डी. पोमाजे, अजित पाटील हुपरी, सतिश चौगुले, अनिल शिंदे, राजेंद्र कावठेकर, सचिन वाडकर, दिपक गाट, सचिन घस्ते, किरण काळोखे, प्रशांत मालगांवे तसेच शाखा संपर्क समिती सदस्य यांच्यासह इतर मान्यवर, सभासद व सर्व पत्रकार बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन श्री. संदीप तांबवेकर यांनी केले, तर व्हाईस चेअरमन श्री. विराज शंकरराव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Banco News
www.banco.news