अग्रसेन को-ऑप.अर्बन बँकेचा १००० कोटींहून अधिक व्यवसाय

आर्थिक कामगिरीत सातत्यपूर्ण वाढ, १५% लाभांश जाहीर
अग्रसेन को-ऑप.अर्बन बँक
अग्रसेन को-ऑप.अर्बन बँक
Published on

तेलंगणा: येथील अग्रसेन को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अध्यक्ष श्री. प्रमोद केडिया यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेत श्री. केडिया यांनी बँकेने ३१ मार्च २०२५ अखेर १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करून ८.९१ कोटी रुपयांचा नफा नोंदवल्याचे सांगून भागधारकांना १५% लाभांश जाहीर केला.

बैठकीत अध्यक्ष केडिया यांनी बँकेच्या जलद विस्तारावरावर बोलताना बँकेतर्फे मार्च २०२५ मध्ये अट्टापूर, बंजारा हिल्स आणि हिमायतनगर येथे तीन नवीन शाखांचे उद्घाटन, त्यानंतर अमीरपेट (२७ जुलै) आणि गगनपहाड (३ ऑगस्ट) येथे अशा नवीन शाखा स्थापित होणार असल्याचे सांगितले. कुकटपल्ली आणि माधापूर येथे आणखी दोन शाखा लवकरच उघडण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

बँकेने सिद्धियांबर बाजार, मलकपेट, अमीरपेट आणि गगनपहाड येथे चार नवीन एटीएमचे उद्घाटन केले, त्यामुळे वर्षअखेरीस बँकेच्या शाखांची संख्या ११ वर पोहोचली आहे, आणखी एक एफएसडब्ल्यूएम शाखा सुरू करण्याची योजना आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या आर्थिक ठळक वैशिष्ट्यांमध्ये ६०३.२९ कोटी रुपयांच्या ठेवी, ४०९.२७ कोटी रुपयांचे कर्जरोखे, ६४.४८ कोटी रुपयांचा राखीव निधी आणि १९.८८% CRAR यांचा समावेश आहे, जो RBI च्या नियमांपेक्षा खूपच जास्त आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षीच्या ७.८१% वरून एकूण एनपीए ६.५२% पर्यंत कमी झाले, तर पीएटी ८.९१ कोटी रुपयांपर्यंत वाढला. बँकेने आता मार्च २०२६ पर्यंत १,२०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या नागरी सहकारी बँकांत गणल्या जाणाऱ्या अग्रसेन को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची ही कामगिरी सर्व आर्थिक बाबींमध्ये मजबूत स्थिती दर्शवते आहे, अशी माहिती श्री. केडिया यांनी दिली.

Banco News
www.banco.news