
कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या:
क्रेडिट स्कोअर उत्कृष्ट राखण्याची ७ रहस्ये!
विशेषतः व्यावसायिकांना आपल्या उद्योग-धंद्यासाठी कर्ज घ्यावे लागते. यावेळी बँकेकडून त्याच्या व्यवसायाच्या माहितीबरोबरच त्याचा क्रेडिट स्कोअर पहिला जातो. याबद्दल आपण येथे सविस्तर जाणून घेऊया.
क्रेडिट स्कोअर (कर्जपात्रता गुणांकन) म्हणजे काय?:
तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे तुमची आर्थिक ओळख. तो तुमच्या आर्थिक कुवतीचा निदर्शक असून तुमची परतफेड करण्याची क्षमता निश्चित करतो.
हा ३ अंकी क्रमांक असतो. यावरून बँक तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही, याचा निर्णय घेते.
स्कोअर जितका जास्त, तितकी तुमची कर्ज परतफेड क्षमता व आर्थिक विश्वासार्हता अधिक, आणि स्कोअर कमी असल्यास याच्या उलट.
तो महत्त्वाचा का आहे?:
चांगला क्रेडिट स्कोअर तुमचे पैसे आणि वेळ वाचवतो. जास्त स्कोअरचा अर्थ:
कर्जाला लवकर मंजुरी मिळते.
जास्त क्रेडिट मर्यादा मिळते.
कर्जाला कमी व्याजदर आकारला जातो.
पेमेंट (देयक परतफेड) इतिहास:
वेळेवर पैसे भरणे अपरिहार्य आहे.
पेमेंट्स वेळेवर केलेली असल्यास चांगल्या क्रेडिट स्कोअरचा पाया भक्कम होतो.
एकदा झालेला डिफॉल्टर सुद्धा (पेमेंटमध्ये दिरंगाई) १०० पॉइंट्सनी स्कोअर कमी करू शकतो.
क्रेडिट स्कोअरवर याचा सर्वाधिक परिणाम होतो.
स्कोअर चांगला आहे का?
ही झलक तुम्हाला तुमची पातळी सांगेल:
६८१ पेक्षा कमी → सुधारणा आवश्यक
६८१–७३० → सरासरी
७३१–७७० → ठीक
७७१–७९० → चांगला
७९० पेक्षा जास्त → उत्कृष्ट
नेहमी ‘चांगला’ किंवा ‘उत्कृष्ट’ गटात राहण्याचे लक्ष्य ठेवणे आवश्यक.
क्रेडिट (पत) वापर (Credit Utilization):
जास्त क्रेडिट वापरल्याने विश्वास कमी होतो.
तुम्ही कर्जावर जास्त विसंबून असणे म्हणजेच जास्त क्रेडिटचा वापर करता.
नेहमीच तुम्हाला उपलब्ध असलेल्या क्रेडिट मर्यादेच्या १५% पेक्षा कमी क्रेडिटचा वापर करावा.
क्रेडिट वापराचा क्रेडिट स्कोअरवर मोठा परिणाम होतो.
क्रेडिट मिक्स:
तुमच्या खात्यांमध्ये विविध प्रकारच्या क्रेडिटचा समतोल असावा.
क्रेडिट खाते जितके जुने, तितके चांगले.
फारच आवश्यक असल्याशिवाय जुनी खाती बंद करू नका.
तुम्ही एकाच वेळी अनेक कर्जे व्यवस्थित हाताळू शकता हे यामुळे बँकेला कळते.
क्रेडिट चौकशी (Credit Inquiries):
नवीन कर्जांसाठी अर्ज करण्यापूर्वी नीट विचार करा.
कमी कालावधीत अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड अर्ज केल्यास हार्ड इन्क्वायरी (कठोर चौकशी) होते. त्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो.
अशी वारंवार चौकशी झाल्यास तुम्ही कर्जासाठी हताश आहात,असा आभास निर्माण होतो.