अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी असोसिएशनच्या (मध्य प्रदेश) सभेस उपस्थित संचालक मंडळ अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी असोसिएशन, मध्य प्रदेश
Co-op Credit Societies

अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी असोसिएशनची सभा उत्साहात संपन्न

राज्यभरातील सभासद, संस्था प्रतिनिधींची उपस्थिती

Pratap Patil

मध्य प्रदेशस्थित भोपाळ येथील हॉटेल छाया श्री रिसॉर्ट, श्यामपूर येथे असोसिएशन ऑफ अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्य प्रदेश (शहरी सहकारी विकास कल्याण संघ, मध्य प्रदेश) ची वार्षिक सर्वसाधारण सभा (२०२५) सभासद, संस्था प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या सभेमध्ये राज्यातील विविध जिल्हा व तालुका पातळीवरील सदस्यांनी तसेच सर्व नागरी सहकारी पतसंस्था समित्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सभेचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष श्री.सर्वेश समाधिया यांनी भूषवले. या सभेमध्ये सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री माननीय श्री. राकेश चौहान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्री. चौहान यांनी आपल्या सहकार क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे सभेला सविस्तर मार्गदर्शन केले.

या सभेमध्ये राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांसमोर असलेल्या आव्हानांवर मात करून त्यांचा विकास कसा साधता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सरकार विभाग आणि संस्थांमध्ये परस्पर समन्वय साधता यावा यासाठी प्रयत्न करण्याचे या सभेत ठरवण्यात आले.

कार्यक्रमात संघटनेच्या उपाध्यक्षा सौ. छाया सैनी यांनी संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि संघटनेला राष्ट्रीय स्तरावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटनेचे ज्येष्ठ सदस्य श्री. शैलेशजी जैन यांनी संस्थांनी आपले कार्य पुढे कसे विकसित करावे या विषयी मार्गदर्शन केले.

संघटनेच्या विषयसूचीप्रमाणे प्रस्ताव व सर्वसाधारण सहमतीने आर्थिक अहवालावर चर्चा, आगामी वर्षाची कार्ययोजना, कार्यविभाजन इत्यादी सर्व आवश्यक विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. पार्थसिंहजी यांनी केले.

SCROLL FOR NEXT