संजीवनी पतसंस्था नूतन अध्यक्ष श्रीमती शेवंताबाई दत्तात्रय अनारसे, उपाध्यक्ष संदीप दिगंबर गदादे, सचिव रवींद्र दत्तात्रय अनारसे  संजीवनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आंबीजळगाव, तालुका कर्जत, जि.अहिल्यानगर
Co-op Credit Societies

संजीवनी पतसंस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बिनविरोध

पारदर्शक व शिस्तबद्ध कामकाजावर भर

बँको वृत्त सेवा

अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील संजीवनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून अध्यक्ष म्हणून श्रीमती शेवंताबाई दत्तात्रय अनारसे आणि उपाध्यक्ष म्हणून संदीप दिगंबर गदादे यांची निवड झाली. सचिवपदी रवींद्र दत्तात्रय अनारसे आणि खजिनदार म्हणून सत्तार इब्राहिम शेख यांची निवड करण्यात आली.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कर्जत तालुका कर्जत यांच्या मान्यतेने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी अहिरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यावेळी सर्वानुमते नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाची निवड करून नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी चेअरमन श्रीमती शेवंताबाई दत्तात्रय अनारसे म्हणाल्या की ही संस्था तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण पतसंस्था असून संपूर्ण संचालक मंडळ व कर्मचारी पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असून संस्थेच्या कामकाजाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. संस्थेमार्फत  सोनेतारण कर्ज वाटप सुरू असून सभासदांना अल्प दराने सोप्या अटींवर त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस श्रीमती शेवंताबाई दत्तात्रय अनारसे यांनी व्यक्त केला.संस्थेचे ४३८८ (चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी) सभासद असून८ कोटी ८४ लाख ७५ हजार २३४ (आठ कोटी चौऱ्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार दोनशे चौतीस) रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.तसेच ९ कोटी ९५ लाख ७३ हजार ६१९ (नऊ कोटी पंच्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार सहाशे एकोणवीस) रुपयांच्या ठेवी असूनसुमारे २ अब्ज ११ कोटी ४३ लाख ८१ हजार ७०१ (दोन अब्ज अकरा कोटी त्रेचाळीस लाख एक्याऐंशी हजार सातशे एक) रुपये वार्षिक उलाढाल आहे.यावर्षी ८ लाख ३२ हजार ६६४ (आठ लाख बत्तीस हजार सहाशे चौसष्ट) रुपये नफा झाला आहे.लवकरच वार्षिक अहवाल सादरीकरण व लाभांश वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे चेअरमन श्रीमती शेवंताबाई दत्तात्रय अनारसे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT