सोलापूर जिल्हा पतसंस्थांची कर्जवसुली करण्यासाठी फेडरेशनचा पुढाकार  सोलापूर जिल्हा फेडरेशन
Co-op Credit Societies

सोलापूर जिल्हा पतसंस्थांची कर्जवसुली करण्यासाठी फेडरेशनचा पुढाकार

जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून १६अधिकारी नियुक्त

बँको वृत्त सेवा

सोलापूर जिल्ह्यात सुमारे १००० पतसंस्था आहेत. सद्यस्थितीत पतसंस्था कर्जवसुली करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. या सर्व कामकाजात जिल्हा सहकारी फेडरेशन सातत्याने पाठपुरावा करत असून थकीत कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विक्री करून कर्ज वसुली केली जात आहे.दरम्यान फेडरेशनने त्यासाठी १६ वसुली अधिकारी नेमणुकीची मागणी केली होती. जिल्हा फेडरेशनच्या मागणीनुसार सोलापूर जिल्हा उपनिबंध कार्यालय यांनी १६ वसुली अधिकारी नेमलेले आहेत.  जिल्हा सहकारी पतसंस्था कलम १०१ व कलम ९१ नुसार प्राप्त प्रमाणपत्राचा उपयोग कर्ज वसुलीसाठी होणार आहे. नवीन अधिकारी जप्त मालमत्तेची तरतूद करून कर्ज वसूल करतील. याविषयी बोलताना  फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात पतसंस्थाचे जाळे मोठे असून संस्था उत्तम कामगिरी करत आहेत.सद्यस्थितीत पतसंस्थांची थकीत कर्ज वसुली वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. थकीत कर्ज वसुलीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम राहतील. फेडरेशनचा उद्देश नेहमी तोच राहिलेला आहे.   

SCROLL FOR NEXT