सिंधुताई पतसंस्थेचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा सिंधुताई महीला नागरी सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

सिंधुताई पतसंस्था, तुमसर, १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गुणवंतांचा सत्कार

Reva Kulkarni

सिंधुताई  महीला नागरी सहकारी पतसंस्था तुमसर, जि. भंडारा १२ वा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेने सातत्याने सभासद हित साधत संस्थेची वाटचाल यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. १२ वर्षे अविरत सेवा देत संस्थेने कार्यक्षमता व कार्यकुशलता सिद्ध केलेली आहे. तुमसर सहाय्य्क निबंधक प्रमोद हुमने, तुमसर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा सिंधु चिंधालोरे यांनी संस्थेच्या ध्येय धोरणाविषयी संकल्पना मांडल्या. ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य जनतेला पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी जनतेचा विश्वास सिंधुताई महिला नागरी पतसंस्थेने संपादन केला असला तरी तो विश्वास आणखी कसा दृढ करता येईल याकडे, संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, यांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीकरीता जनतेचा विश्वास कायमस्वरुपी मोलाचा ठरत असतो. त्याच धर्तीवर सिंधुताई महीला नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक शिखराकडे वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन सिंधुताई महीला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा सिंधु चिंधालोरे यांनी केले.

SCROLL FOR NEXT