सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित,सिंधुदुर्ग पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने पतसंस्था सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव कार्यक्रम व सेवा निवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ दिनांक २० जुलै २०२५ रोजी पतसंस्था अध्यक्ष श्री राजन सावंत व उपाध्यक्ष श्री सुनील टेमकर यांच्या शुभहस्ते पार पडला. गुणवंत पाल्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम व गुणगौरव पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सेवानिवृत्त सभासदांना शाल , श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी गुणवंत पाल्यांमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त कुमार प्रकाश लांबोर , कुमारी स्वरा दिपक बांदेकर , माध्यमिक शालांत परीक्षा ईयत्ता दहावीमध्ये चमकदार कामगिरी केलेले कुमारी दुर्वा दशरथ सावंत , कुमार आर्यन अमर वाघमारे , कुमारी गौरांगी मेस्त्री तसेच उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ईयत्ता बारावीमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेल्या हर्षवर्धन वासुदेव पाटील यांचा समावेश होता.
गुणवंत पाल्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशोशिखर दूर नाही. या पाल्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादीत केलेल्या व्यक्तीमत्वांचा आदर्श समोर ठेवून पुढील वाटचाल करावी तसेच गुणवंत पाल्य हि संबंधित कुटुंबासाठी भूषण आहेतच त्याचबरोबर ते भविष्यातील भारताचे भक्कम आधारस्तंभ , जबाबदार नागरीक असून राष्ट्राची संपत्ती आहेत. असे गौरवोद्गार पतसंस्था अध्यक्ष श्री राजन सावंत यांनी काढले .या पाल्यांना पतसंस्थेच्या वतीने भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यामध्ये श्री. राजाराम शिवराम चव्हाण सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी आणि श्री. आनंद रामचंद्र धूरी सेवानिवृत्त कृषी सहाय्यक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सदरील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या कृषि विभागातील व पतसंस्थेच्या प्रगती मधील योगदानाबद्दल पतसंस्था अध्यक्ष श्री. राजन सावंत यांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानून त्यांच्या सेवानिवृत्तीपर भावी वाटचालीस व निरोगी दीर्षायु ष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सभेचे सूत्रसंचालन सचिव श्रीमती प्रतिक्षा हडकर व आभार प्रदर्शन संचालक श्री. श्रीपाद चव्हाण यांनी केले.