श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या हिंजवडी येथील ०८ व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष मा. सुनील चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक संभाजीशेठ गवारी, अध्यक्ष शिवाजीराव गवारी, उपाध्यक्षा सुरेखाताई गवारी, खजिनदार श्री संतोषशेठ गवारी इतर सर्व शाखांचे संचालक सल्लागार मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सुरेश हुलावळे, हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर, जिल्हा परिषद माजी सदस्या स्वातीताई हुलावळे, पुणे जिल्हा फेडरेशन उपाध्यक्ष शामराव हुलावळे, माजी उपसरपंच संजय बुचडे, माजी सरपंच तानाजी नाना हुलावळे, म्हाळुंगे गावचे माजी सरपंच नामदेवराव गोलांडे हे उपस्थित होते.
तसेच, प्रेरणा बँकेचे संचालक गबाजी वाकडकर, भाजप युवा नेते राहुल जाधव, मनसे नेते गणेश शिंदे, माजी सरपंच सचिन आबा जांभुळकर, माजी सरपंच बाळासाहेब शितोळे, खादी ग्रामोद्योग सदस्य लक्ष्मण जाधव, मुळशी तालुका वारकरी संघ अध्यक्ष बाबाजी शेळके, शिवसेना नेते संतोष पवार, भाजप पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष राम वाकडकर, मुळशीचे ज्येष्ठ नेते दिलीप मामा हुलावळे, कासारसाईचे उपसरपंच गुलाब लेणे, माजी नगरसेविका रेखाताई दर्शीले, संतोष ढवळे, अभिषेक जांभुळकर, म्हातोबा पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ विनोदे, तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोलप सर यांनी केले. संस्थेचे सीईओ अमोल गवारी यांनी प्रस्तावना सादर केली. यावेळी सुनिलभाऊ चांदेरे, स्वातीताई हुलावळे, लक्ष्मण जाधव, नामदेवराव गोलांडे आणि शिवाजीराव गवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शाखेचे स्थानिक संचालक सल्लागार भरत बोडके, नंदकुमार भोईर, मल्हारी बोडके, ओमकार दर्शले, दिपक ववले, राहुल ओझरकर, सचिन जांभुळकर, योगेश भानुसे, संकेत जांभुळकर, पांडुरंग राक्षे, नानासाहेब ठाकर, ऋषिकेश कदम, वंदना साखरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी पतसंस्थेचे संचालक व राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुळशी तालुका अध्यक्ष समीर बुचडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.