पद्मविभूषण डॉ शरदचंद्रजी पवार पतसंस्था क्यू आर कोड सुविधा वितरण प्रसंगी आ.आशुतोष काळे, चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी व संचालक मंडळ. पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था
Co-op Credit Societies

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेची क्यूआर कोड सुविधा सुरू

डिजिटलायजेशनकडे वाटचाल

Reva Kulkarni

पतसंस्था क्षेत्रात नावाजलेल्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल व्यवहाराकडे अजून एक पाऊल पुढे टाकतांना आपल्या ग्राहकांसाठी क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली असून व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व्यवहार करावेत असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले.

पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने सुरु केलेल्या क्यू आर कोड सेवेचे वितरण नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे यांनी छोट्या-मोठ्या उद्योजकांना तसेच व्यापारी व शेतकरी वर्गाला आर्थिक सुबत्ता देण्याचं काम केल आहे. तीच परंपरा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा.आ. अशोकराव  काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत सुरु आहे. त्यामुळे संस्था दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने झेप घेत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच सर्वच बँकांनी डिजिटल व्यवहार सुरु केले आहेत. संस्थेने देखील वेळीच काळाची पावले ओळखून यापूर्वीच ऑनलाइन बँकिंग सुविधा, एसएमएस सुविधा, आरटीजीएस व एन.एफ.टी सुविधा सुरू केली असून या सेवेचा ग्राहक लाभ घेत आहेत. त्यामुळे आपण देखील कोणत्याही बाबतीत मागे न राहता पतसंस्थेच्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यामुळे निश्चितच व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांना अधिक सोपा, जलद व सुरक्षित आर्थिक व्यवहार करता येणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक अनिलराव महाले, सुदामराव वाबळे, व्यंकटेश बारहाते, महेन्द्र काळे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर, तालिब सय्यद, चंद्रशेखर कडवे, भाऊसाहेब लुटे, भाऊसाहेब माळशिखरे, रविंद्र निकम, व्यवस्थापक मंगेश देशमुख, त्यांचे सहकारी तसेच व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT