गोडोली येथील साईशक्ती पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनदिन  दीपप्रज्वलन करताना जनता सहकारी बँकेचे पॅनल प्रमुख विनोद कुलकर्णी, शेजारी चेअरमन व्यंकटराव मोरे,व्हाईस चेअरमन राजू घुले,दैनिक तरुण भारतचे संपादक दीपक प्रभावळकर
Co-op Credit Societies

साईशक्ती पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनदिन उत्साहात

गोडोली येथील साईशक्ती पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनदिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

Reva Kulkarni

सभेला सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन अविनाश कदम यांची उपस्थिती होती.साईशक्ती पतसंस्थेमध्ये ३३ वर्षाच्या कालावधीत आर्थिक व्यवहार शिस्तबद्ध असून सध्यस्थितीत संस्थेकडे २२ कोटी पेक्षा जास्त ठेवी जमा असून १६ कोटी पेक्षा जास्त कर्ज वितरण झालेले आहे. सुरक्षित गुंतवणुकीमध्ये ८ कोटीपेक्षा जास्त रक्कम विविध बँकांमध्ये ठेवली आहे. ३ कोटीपेक्षा जास्त स्वनिधी असून संस्था स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' हा लौकिक प्राप्त करत असून सभासदांना सतत स्थापनेपासून रोख स्वरूपात लाभांश देणारी बहुदा ही एखादीच पतसंस्था असावी. सी.आर.आर. २ टक्केपेक्षा जास्त एस.एल.आर.४० टक्के पेक्षा जास्त हे आदर्श प्रमाण असून एन.पी.ए. प्रमाण १.५ टक्केपेक्षा कमी राखण्यात यश मिळवले आहे.

साईशक्ती पतसंस्था आज ३३ वर्षे पूर्ण करून ३४ व्या वर्षात यशस्वी वाटचाल करत असताना व्यंकटराव मोरे यांच्या बरोबरीने व्हाईस चेअरमन राजू घुले, संचालक लक्ष्मणराव मोरे, तज्ञ संचालक जीवनधर चव्हाण, ऍडव्होकेट योगेश मोरे, कार्यलक्ष्मी संचालक विपुल मोरे, सचिव श्रीकांत जाधव हे कर्मचारी वृंद व सर्व सभासद ग्राहक यांच्या विश्वासाने व सहकार्याने पतसंस्था उत्तम कामगिरी करत असून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

लवकरच साईशक्ती पतसंस्था सीबीएस प्रणालीचा अवलंब करणार आहे त्यामुळे  संस्थेचे सर्व व्यवहार एका क्लिकवर म्हणजेच कोअर बँकिंग, एसएमएस सुविधा, मोबाइल बैंकिंग या सुविधा लवकरच संस्थेतर्फे सुरू होणार असून साईशक्ती पतसंस्था डिजिटलायझेशनच्या युगात लवकरच प्रवेश करणार आहे. त्यामुळे लवकरच साईशक्तीच्या ग्राहकांना घरबसल्या आपले आर्थिक व्यवहार करता येतील त्याचबरोबर क्युआर कोड करण्याचाही मानस असल्याचे चेअरमन अविनाश कदम यांनी बोलून दाखवले.संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये संस्थेला सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने दिला जाणारा दीपस्तंभ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.

SCROLL FOR NEXT